Narendra Modi: अमेरिकेहून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करणार; युनिक हेल्थ आयडी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 01:54 PM2021-09-23T13:54:11+5:302021-09-23T13:54:51+5:30
Pradhan Mantri Digital Health Mission डिजिटल इंडिया’ योजनेअंतर्गत, केंद्र सरकार राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान (Pradhan Mantri Digital Health Mission) सुरू करत आहे. या मोहिमेचा उद्देश आरोग्य क्षेत्रातील लोकांना जागरूक करणे आणि त्यांना आरोग्य अभियानाशी जोडणे हा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर मोठ्या योजनेची सुरुवात करणार आहेत. याद्वारे प्रत्येक भारतीयाला युनिक हेल्थ आयडी मिळणार आहे. आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी याची माहिती दिली आहे. (PM Narendra Modi to announce nationwide rollout of Pradhan Mantri Digital Health Mission on September 27.)
‘डिजिटल इंडिया’ योजनेअंतर्गत, केंद्र सरकार राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान (Pradhan Mantri Digital Health Mission) सुरू करत आहे. या मोहिमेचा उद्देश आरोग्य क्षेत्रातील लोकांना जागरूक करणे आणि त्यांना आरोग्य अभियानाशी जोडणे हा आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याचे रेकॉर्ड असणार आहे.
PM Narendra Modi to announce nationwide rollout of Pradhan Mantri Digital Health Mission on September 27. Under this, a unique digital health ID will be provided to the people, which will contain all the health records of the person: Union Health Minister Mansukh Mandaviya pic.twitter.com/gyKI7FI8JU
— ANI (@ANI) September 23, 2021
या आरोग्य कार्डाचा जो आयडी असेल तो आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या मदतीने बनविला जाणार आहे. PH-DHM चा प्रमुख उद्देश हा भारताची आरोग्य सेवा प्रणाली आणखी चांगली बनविणे हा आहे. याद्वारे हेल्थकेअरच्या गरजांना वन स्टॉप सोल्यूशन बनविण्याची तयारी आहे. यामुळे आरोग्य सेवा पुरविणाऱ्या संस्थांपर्यंत पोहोचणे सोपे होणार असून त्यांना यावर उत्तर द्यावे लागणार आहे.
प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन (Pradhan Mantri Digital Health Mission) हे सध्या पायलट प्रोजेक्टवर चालविले जात आहे. NDHM च्या वेबसाईटवर गेल्यास तुम्हाला हेल्थ आयडी बनविण्याचा पर्याय असेल परंतू तुम्ही त्यावर बनवू शकणार नाही. तो जिथे पायटल प्रोजेक्ट सुरु आहे, तिथेच वापरता येत आहे.