समतानगरातील मुलाला विषबाधा

By admin | Published: July 3, 2016 12:32 AM2016-07-03T00:32:47+5:302016-07-03T00:32:47+5:30

जळगाव : समतानगरमधील राकेश भरत सुरवाडे (१४) या मुलाने कोणतातरी द्रव सेवन केल्याने त्याला विषबाधा झाली होऊन प्रकृती गंभीर आहे.

Poisoning the child in the hometown | समतानगरातील मुलाला विषबाधा

समतानगरातील मुलाला विषबाधा

Next
गाव : समतानगरमधील राकेश भरत सुरवाडे (१४) या मुलाने कोणतातरी द्रव सेवन केल्याने त्याला विषबाधा झाली होऊन प्रकृती गंभीर आहे.
शनिवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेदरम्यान राकेश हा घरी आला असता त्याची प्रकृती खालावली. त्यावेळी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने त्याने कोणतातरी विषारी द्रव सेवन केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. डॉक्टरांनी त्याच्या पोटातून सर्व विषारी पदार्थ काढला, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्याने काय सेवन केले हे त्याच्या आई व घरातील इतरांनाही माहित नव्हते. जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा या ठिकाणी मित्र व नातेवाईकांची गर्दी झाली होती.

Web Title: Poisoning the child in the hometown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.