प्रदुषणामुळे वाढतोय जीवघेण्या टीबी चा धोका, जाणून घ्या बेसिक कफ मॅनेजमेंटचा इफेक्टीव्ह उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 11:13 AM2020-01-26T11:13:14+5:302020-01-26T11:15:15+5:30
वाढत्या प्रदुषणामुळे आणि जीवनशैलीच्या बदलामुळे अनेक आजार वाढत जात आहेत.
(image credit-carespot.com)
वाढत्या प्रदुषणामुळे आणि जीवनशैलीच्या बदलामुळे अनेक आजार वाढत जात आहेत. सर्दी, खोकला झाल्यास आपण त्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असतो. पण एका विशिष्ट मर्यादेनंतर जर आपण या आजारांकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला हीच गोष्ट महागात पडू शकते. यामुळे टीबीसारखे गंभीर आजार पसरत आहेत. या आजारात फुप्पुसांवर परिणाम होत असतो. वेळीच योग्य पध्दतीने उपाय केल्यास या आजाराला पूर्णपणे बरं करता येऊ शकतं. टीबी या आजारात वेगळी असा त्रास होत नाही. आरोग्याच्या तक्रारी आपल्याला वारंवार उद्भवत असतात. त्याच मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागतात. चला तर मग जाणून घ्या काय आहेत या आजाराची लक्षणं आणि उपाय.
लक्षणं
तीन आठवड्यापेक्षा जास्त खोकला येणे, छातीत दुखणे, खोकण्याबरोबरच रक्त बाहेर येणे , छातीत वेदना होणे, थकल्यासारखं वाटणे, अचानक वजन कमी होणे, थंडी वाजणे, ताप येणे, रात्री घाम येणे ,भूक न लागणे. जर तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणं आवश्यक आहे.
टीबीचा आजार कसा पसरतो
एका व्यक्तीच्या फुप्पुसांमध्ये जर टीबी सक्रिय असेल तर हवेच्या माध्यामातून हा आजार पसरत जातो. जर तुम्ही टीबी असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असाल तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा - हिवाळ्यात आर्थ्राइटिसचा वाढतोय धोका, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय...)
टीबीला कसं रोखाल
केद्रिंग स्वास्थ मंत्रालयाद्वारे भारत सरकारने बेसिक कफ मॅनेजमेंट अशी वैद्यकीय योजना आखली आहे त्याद्वारे टीबीला रोखता येऊ शकतं. (हे पण वाचा-व्यायाम आणि डाएटिंग करून सुद्धा वजन कमी होत नाही? तर हे असू शकतं कारण, वेळीच व्हा सावध!)
टीबी होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी
खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवा.
हात-पाय धुत असताना एंटी-बॅक्टीरियल साबणाचा वापर करा.
काम करत असताना मोकळ्या आणि उजेड असेलेल्या जागेत बसा.
मोकळ्या जागी बाहेर थुंकू नका.