डाळिंबाची साल अनेक समस्यांवर ठरते बेस्ट उपाय, अनेकांना माहीत नसतात फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:11 AM2024-01-31T10:11:24+5:302024-01-31T10:11:49+5:30

Pomegranate Peels : डाळिंबाच्या सालीमध्ये अनेक शरीरासाठी फायदेशीर अनेक तत्व असतात. हे फायदे वाचाल तुम्ही डाळिंबाची साल कधीच फेकणार नाही.

Pomegranate peel benefits will surprise you pomegranate peel beneficial for weight loss anti ageing digestion used in this way | डाळिंबाची साल अनेक समस्यांवर ठरते बेस्ट उपाय, अनेकांना माहीत नसतात फायदे...

डाळिंबाची साल अनेक समस्यांवर ठरते बेस्ट उपाय, अनेकांना माहीत नसतात फायदे...

Pomegranate Peels : डाळिंबाचे गोड दाणे खाणं सगळ्यांनाच आवडतं. सामान्यपणे डाळिंबातील दाने खाऊन त्याची साल फेकून देतात. पण डाळिंबाच्या सालीचेही आरोग्याला अनेक फायदे होतात हे अनेकांना माहीत नाही. डाळिंबाच्या सालीमध्ये अनेक शरीरासाठी फायदेशीर अनेक तत्व असतात. हे फायदे वाचाल तुम्ही डाळिंबाची साल कधीच फेकणार नाही. चला जाणून घेऊ याचे फायदे....

डाळिंब आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं. रोज डाळिंब खाल तर याने शरीरात रक्ताची कमतरता होणार नाही. जर एक महिना तुम्ही डाळिंबाचा ज्यूस प्याल तर शरीरात रक्त वाढतं आणि रक्त शुद्धही होतं. तसेच याने पोटाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. 

साल सुकवून त्याचं चूर्ण बनवा

जेव्हा तुम्ही डाळिंब खाता तेव्हा त्याची साल काढून ती वाळवा. त्यानंतर त्यापासून चूर्ण तयार करा. हे चूर्ण तुम्ही रोज सेवन करा. याने तुम्हाला आरोग्यात फरक दिसू लागेल.

अजून फायदे

जर तुम्ही रोज या चूर्णाचं सेवन कराल तर तुमची त्वचा हेल्दी दिसू लागेल. त्याशिवाय याने घशातील खवखवही दूर करण्यास मदत मिळते. त्यासोबत याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते.

पचन तंत्र राहतं मजबूत

डाळींबाच्या सालीने पचन तंत्र मजबूत राहतं. कानासंबंधी समस्या असणाऱ्या लोकांनाही यापासून फायदा मिळू शकतो. ज्यांच्या कानात वेदना किंवा इतर समस्या असेल तर याने समस्या दूर होईल.

Web Title: Pomegranate peel benefits will surprise you pomegranate peel beneficial for weight loss anti ageing digestion used in this way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.