'हा' पदार्थ वापरुन झटपट कमी करु शकता तुम्ही वजन, फुलांपासून मिळतो अन् फायदे भरपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 09:07 AM2022-07-04T09:07:59+5:302022-07-04T09:24:22+5:30

खसखसमध्ये प्रोटीन, फायबर, ऊर्जा, कार्बोहायड्रेट्स, लोह, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन बी6, ओमेगा-6 फॅटी ऍसिडस्, मॅग्नेशियम, यांसारखे पोषक असतात. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी खसखस कशी फायदेशीर ठरते.

poppy seeds are extremely beneficial in weight loss or to loose weight | 'हा' पदार्थ वापरुन झटपट कमी करु शकता तुम्ही वजन, फुलांपासून मिळतो अन् फायदे भरपूर

'हा' पदार्थ वापरुन झटपट कमी करु शकता तुम्ही वजन, फुलांपासून मिळतो अन् फायदे भरपूर

Next

जेवणात मसाल्याच्या भाज्यांमध्ये आपण खसखस (Poppy Seeds) वापरतो. पण तुम्ही कधी वजन कमी करण्यासाठी खसखस (Poppy Seeds For Weight Loss) खाल्ली आहे का? नसेल तर त्याचा आहारात नक्की समावेश करा. कारण छोट्या छोट्या दिसणाऱ्या या खसखस ​​बियांमध्ये अनेक प्रकारचे पोषक असतात, जे आरोग्यास अनेक फायदे (Poppy Seeds Benefits) देतात. ज्यांचे वजन वाढत आहे त्यांनी खसखस ​​जरूर खावी. खसखसमध्ये प्रोटीन, फायबर, ऊर्जा, कार्बोहायड्रेट्स, लोह, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन बी6, ओमेगा-6 फॅटी ऍसिडस्, मॅग्नेशियम, यांसारखे पोषक असतात. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी खसखस कशी फायदेशीर ठरते.

अशा प्रकारे वजन कमी करते खसखस
झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, खसखसमध्ये असलेले झिंक थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत ठेवते. त्याचबरोबर यामध्ये असलेले मॅंगनीज मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी खसखस ​​हा एक चांगला पर्याय आहे. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी खसखसचे सेवन जरूर करावे. खसखस हृदय, पचनसंस्था, केस, त्वचा, निद्रानाश, मधुमेह, हाडे आणि न्यूरोलॉजिकल समस्यांसह अनेक आजारांवर उपयुक्त आहे. वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने खा खसखस

तयार पदार्थांवर खसखस गार्निशिंगसाठी टाका
खसखसमध्ये फायबर असल्याने वजन कमी करण्यात खूप मदत होते. तुमच्या दैनंदिन आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे. तयार पदार्थांवर खसखस टाकून गार्निश करा (Use Poppy Seeds For Garnishing) आणि ही पद्धत नियमित वापरून पहा, काही आठवड्यांत त्याचा परिणाम दिसून येईल.

खसखसचे सरबत प्या
खसखस खाण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे खसखस सरबत. खसखसचे सरबत (Poppy Seeds Drink) प्यायल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही आणि तुमचे जास्तवेळा खाणे कमी होईल. असे नियमित केल्याने तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास सुरुवात होईल.

खसखस दुधात मिसळा
खसखस आणि दूध मिसळल्याने (Poppy Seeds With Milk) आपल्या शरीरासाठी अनेक फायदे होतात. याच्या सेवनाने स्नायू आणि हाडे मजबूत होतात. एका ग्लास दुधात 1 चमचा खसखस ​​उकळून कोमट झाल्यावर प्या. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहील आणि तुम्ही जास्त खाणे टाळाल. वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याच्या वेळेत खसखसचे सेवन करा.

Web Title: poppy seeds are extremely beneficial in weight loss or to loose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.