तहान भागवणारे 'हे' पॉप्युलर सॉफ्ट ड्रिंक्स बनू शकतात आतड्यांच्या कॅन्सरचं कारण, रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 02:32 PM2022-01-03T14:32:40+5:302022-01-03T14:34:33+5:30

Bowel Cancer : 'द सन'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, जर्नल Gut मध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, शुगर असलेले ड्रिंक्स आणि जीवघेणा कॅन्सर यात संबंध आढळून आला आहे.

Popular soft drinks are doubling risk of bowel cancer in adults | तहान भागवणारे 'हे' पॉप्युलर सॉफ्ट ड्रिंक्स बनू शकतात आतड्यांच्या कॅन्सरचं कारण, रिसर्चमधून खुलासा

तहान भागवणारे 'हे' पॉप्युलर सॉफ्ट ड्रिंक्स बनू शकतात आतड्यांच्या कॅन्सरचं कारण, रिसर्चमधून खुलासा

Next

तुम्ही जर आवड म्हणून किंवा तहान भागवायची म्हणून सॉफ्ट ड्रिंकचं (Soft Drinks) सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण सॉफ्ट ड्रिंक पिण्याच्या या सवयीमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. एका नव्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, शुगर असलेल्या पेय पदार्थाचं सेवन केल्याने आंतड्यांचा कॅन्सर (bowel cancer) होण्याचा धोका जास्त राहतो आणि जे लोक दिवसातून सॉफ्ट ड्रिंकच्या दोन बॉटल पितात त्यांच्यात हा धोका दुप्पट असतो.

५० वयाआधी महिलाही होतात शिकार

'द सन'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, जर्नल Gut मध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, शुगर असलेले ड्रिंक्स आणि जीवघेणा कॅन्सर यात संबंध आढळून आला आहे. यात सांगण्यात आलं आहे की, हे ड्रिंक्स सेवन करणाऱ्या वयस्क लोकांमध्ये आतड्यांच्या कॅन्सरचा धोका अधिक राहतो. असे वयस्क लोक जे दिवसातून दोन बॉटल ड्रिंक्स घेतात, त्यांना हा धोका दुप्पट असतो. महिलांबाबत सांगायचं तर त्या ५० वर्षांच्या होण्याआधीच कॅन्सरच्या जाळ्यात येण्याचा धोका असतो. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, केवळ सॉफ्ट ड्रिंकच नाही तर फ्रूट्सचे फ्लेवर असलेले ड्रिंक्स, स्पोर्ट्स आणि एनर्जी ड्रिंक्स यांचाही आरोग्याला गंभीर धोका आहे.

दरवर्षी होतात इतके मृत्यू

ब्रिटनमध्ये आतड्यांचा कॅन्सर दुसरा सर्वात मोठा जीवघेणा आजार आहे. इथे साधारण १६ हजार लोक दरवर्षी या कॅन्सरचे शिकार होऊन आपला जीव गमावतात. आतड्याच्या कॅन्सरची सुरूवात मोठ्या आतडीपासून होते. याला प्रारंभिक अवस्थेत पॉलीप्स असं म्हणतात. आतड्यांचा कॅन्सर जीवघेणा असतो. पण जर लवकर याची माहिती मिळाली तर हेल्दी लाइफस्टाईल आणि ट्रीटमेंटने स्थित नियंत्रणात करता येते.

कसा केला रिसर्च?

वैज्ञानिकांनी साधारण २४ वर्षांपर्यंत ९५ हजार ४६४ सहभागी लोकांवर नजर ठेवली. यात आतड्यांच्या कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास, लाइफस्टाल आणि आहार यावर लक्ष दिलं. यादरम्यान त्यांना आढळलं की, ज्या महिलांनी शुगर युक्त ड्रिंक्सचं सेवन केलं होतं त्यांच्यात ५० वयाच्या आतच आतड्यांचा कॅन्सर विकसित झाला होता. अशा १०९ महिला होत्या. ज्या महिलांनी दिवसातून एकापेक्षा जास्त ड्रिंक्स केलं असेल त्यांच्यात कॅन्सरचा धोका अधिक आढळला.

कसा कराल बचाव?

रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं की, जर या ड्रिंक्समध्ये कृत्रिम रूपाने गोड पेय पदार्थ कॉफी किंवा सेमी स्किम्ड किंवा दुधाच्या ड्रिंक्सने बदललं असेल तर आतड्यांच्या कॅन्सरचा धोका ३६ टक्के कमी होतो. वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की, शुगर युक्त ड्रिंक्स सेवन आतड्यांच्या कॅन्सरच्या सुरूवातीला महत्वपूर्ण योगदान देऊ शकतं. वैज्ञानिक म्हणाले की, Sugar-Sweetened Drinks चं इंटेक कमी करून किंवा त्याऐवजी दुसरे पेय सेवन करून तरूण या जीवघेण्या आजारापासून आपला बचाव करू शकतात.
 

Web Title: Popular soft drinks are doubling risk of bowel cancer in adults

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.