पोस्ट प्रेग्नेन्सी डिप्रेशन आलंय? चिंता करू नका....हे उपाय करा;डिप्रेशन होईल दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:34 PM2021-06-03T17:34:27+5:302021-06-03T17:35:30+5:30
मुलं झाल्यावरही स्त्रियांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बरेचदा त्यांच्यावर मानसिक ताण येतो. या मानसिक ताणामुळे डिप्रेशनही येऊ शकते. चला जाणून घेऊया अशावेळी काय करावे?
गर्भवती होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाची बाब असते. त्यामुळे जसे तिच्या शरीरात बदल होतात तसेच मानसिक बदलही होतात. मुलं झाल्यावरही स्त्रियांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बरेचदा त्यांच्यावर मानसिक ताण येतो. या मानसिक ताणामुळे डिप्रेशनही येऊ शकते. चला जाणून घेऊया अशावेळी काय करावे?
अँटीऑक्सिडंट्स
अँटीऑक्सिडंट्स डिप्रेशनशी सामना करण्यात भरपूर मदत करतात. काहीवेळा डिप्रेशनमुळे आपल्या मेंदुत नकारात्मक बदल होतात. अशा वेळी अँटीऑक्सिडंट्स या बदलांना सुरळीत करून डिप्रेशन नियंत्रणात आणतात. तुम्ही पिवळ्या, लाल आणि ऑरेंज रंगाच्या भाज्या किंवा फळांचा आहारात समावेश केला पाहिजे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. तुम्ही या रंगाच्या ढोबळी मिरच्याही उपलब्ध असतात त्या खाऊ शकता. तसेच रताळे खाऊ शकता.
आंबवलेले अन्न
ईडली, ढोसा, आप्पे, ढोकळा याचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा यात मुलं झाल्यानंतर येणारे डिप्रेशन दूर करण्यासाठी महत्वाचे घटक असतात. यामध्ये आंबवण्याच्या प्रक्रियेत जे बॅक्टीरिया असतात त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाण दही, ताक, लस्सी अशा गोष्टीही तुम्ही आहारात समाविष्ट करू शका.
हर्बल मिक्स
ऑरिगानो, वेलची, केशर असे पदार्थ अशा प्रकारचे डिप्रेशन दूर करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. तुम्ही हे पदार्थ दुध किंवा सॅलड्समध्ये घालून खाऊ शकता. त्यामुळे तुमच्या शरारीतील सेरॉटॉनिन आणि डोपामाईन हे हार्मोन सुरळीतपणे कार्य करतात जे मानसिक ताण दूर करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
सीड्स
तीळ, सुर्यफुलाच्या बिया यादेखील मानसिक ताण-तणाव दूर करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. आपण जेव्हा डिप्रेस असतो तेव्हा आपल्याला गोड पदार्थ जास्त खावेसे वाटतात. पण हे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्याएवजी तीळ किंवा सुर्यफूलाच्या बिया खा. तुम्हाला हे फायदेशीर ठरेल.
व्यायाम
व्यायाम हा डिप्रेशनवरचा सर्वात उत्तम उपाय आहे. व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरात सकारात्मक बदल घडून येतो. आनंदी राहण्यासाठीची जी संप्रेरके आहेत ती उत्तम स्त्रवतात. त्यामुळे तुम्ही सकारात्मक होता.