बाळंतपणानंतर असं कमी करा वाढलेलं वजन; 'या' टिप्स करतील मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 12:25 PM2019-11-08T12:25:44+5:302019-11-08T12:26:27+5:30
गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं. हे वजन जेवढ्या वेगाने वाढतं, तेवढ्या वेगान कमी मात्र होत नाही. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरही न्यू मदर्सना वजन कमी करणं मात्र अत्यंत अवघड होतं.
गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं. हे वजन जेवढ्या वेगाने वाढतं, तेवढ्या वेगान कमी मात्र होत नाही. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरही न्यू मदर्सना वजन कमी करणं मात्र अत्यंत अवघड होतं. डायटिंग व्यतिरिक्तही इतरही काही उपाय आहेत. ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी सहज वजन कमी करू शकता.
योग्य डाएट करेल मदत
गरोदरपणानंतर जंक फूड खाण्याची प्रचंड इच्छा होते. परंतु, तुम्हाला स्वतःवर थोडासा कंट्रोल करणं गरजेचं असतं. दिवसभरात 6 छोट्या मिल्सचा आहारात समावेश करा. त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ उपाशी रहावं लागणार नाही. तसेच भूक लागल्यामुळे काहीही खाण्यापासून बचाव होऊ शकतो. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या कॅलरी काउंटवरही लक्षं देऊ शकता आणि एक्स्ट्रा फॅट वाढण्यापासून रोखू शकता.
योगाभ्यास करण्याचा करा प्रयत्न
गरोदपणानंतर योगाभ्यास करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे न्यू मदर्सनी योगाभ्यास करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्याव्यतिरिक्त काही विशेष योगासनंही शरीरासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतात.
भरपूर पाणी प्या
शरीरामधील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी पाणी मदत करतं. हायड्रेशनमुळे शरीराला पोषण मिळतं. त्याचबरोबर पोटही भरल्यासारखं वाटतं. यामुळे तुम्हाला फार कमी भूक लागते. पाणी प्यायल्याने मेटबॉलिज्म योग्य राहतं. तसेच वजन कमी करण्यासाठी मदत होते.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)