दिलासादायक! कोरोनाचं सगळ्यात प्रभावी एंटी व्हायरल औषध सापडलं; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 05:23 PM2021-02-03T17:23:05+5:302021-02-03T17:38:51+5:30

CoronaVirus News & Latest Updates :या एंटी व्हायरल औषधानं भविष्यात व्हायरसची माहामारी रोखण्यात यश येईल. हा अभ्यास युकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघमच्या संशोधकांनी केली आहे.

Potential antiviral treatment for covid-19 identified at science | दिलासादायक! कोरोनाचं सगळ्यात प्रभावी एंटी व्हायरल औषध सापडलं; तज्ज्ञांचा दावा

दिलासादायक! कोरोनाचं सगळ्यात प्रभावी एंटी व्हायरल औषध सापडलं; तज्ज्ञांचा दावा

googlenewsNext

कोरोनाच्या माहामारीला वर्ष उलटले तरिही प्रभाव कमी झालेला दिसून आलेला नाही. कोरोना व्हायरसबाबत शास्त्रज्ञांचे अधिक संशोधन सुरू आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अधिक प्रभावी असलेल्या औषधाचा शोध घेण्यात आला आहे. या एंटी व्हायरल औषधानं भविष्यात व्हायरसची माहामारी रोखण्यात यश येईल. हा अभ्यास युकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघमच्या संशोधकांनी केली आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघमच्या संशोधकांनी एका  झाडाच्या मदतीनं एंटीव्हायरल औषध थाप्सीगार्गिन तयार केलं आहे.  डॉक्टरांनी केलेल्या दाव्यानुसार या औषधाचे लहान-लहान डोस काही दिवस सतत घेतल्यानं शरीरात ब्रॉड स्पेक्ट्रम होस्ट सेंटर्ड एंटीव्हायरल इनेट इम्यून रिस्पॉन्स तयार होतो. म्हणजेच शरीरात मोठ्या प्रमाणावर रोगप्रतिकारकशक्ती  विकसित केली जाते. 

Potential antiviral treatment for Corona identified

एंटीव्हायरल औषध थाप्सीगार्गीनमध्ये  रोगप्रतिराकशक्ती वाढवण्याची क्षमता आहे. कोरोना व्हायरसशी संबंधित तीन रेस्पिरेटर्सनी व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं. रुग्णाला गंभीर रेस्पिरेटरी व्हायरल संक्रमण झाल्यास  कोणत्या प्रकारच्या व्हायरसचा  दुष्परिणाम जास्त आहे हे पाहणं कठीणं होतं. याबाबतचा अभ्यास जर्नल वायरसेसमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनसार एंटी व्हायरल औषधानं सामुहिक प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतं.

चिंताजनक! पुन्हा स्वरूप बदलणार ब्रिटनमधील कोरोना व्हायरसचा स्ट्रेन; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

प्राण्यांवर या औषधाचे परिक्षण पूर्ण झाले असून रिसर्चनुसार थाप्सीगार्गिन  हे औषध व्हायरल संक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी परिणामकारक ठरत आहे. संक्रमणाच्या आधी आणि नंतर दोन्हीवेळेला या औषधाच्या वापराचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. या औषधानं व्हायरसचं म्यूटेशन आणि नवीन कॉपी बनण्यापासून रोखता येतं. या औषधाशी संपर्क आल्यानंतर पुढच्या  ४८ तासांपर्यंत व्हायरस कोणत्याही प्रकारचे म्यूटेशन करू शकत नाही. 

इशारा! पॅरासिटामोलच्या ओव्हरडोजमुळे लिवरला गंभीर धोका, जाणून घ्या साइड इफेक्ट्स....

या औषधाला घेताना इंजेक्शनची गरज भासत नाही. एखाद्या टॅबलेटप्रमाणे थाप्सीगार्गिन हे औषध घेतलं जाऊ शकतं.  रुग्णालयात भरती होण्याची शक्यता या औषधानं कमी होते. तज्ज्ञ किन-चाऊ- चांग यांनी सांगितले की, ''भविष्यात ज्या माहामारी येणार त्या प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणार आहेत. अशा स्थितीत नवीन जनरेशनचे थाप्सीगार्गिन हे औषध आजारांना बरं करण्याासाठी फायदेशीर ठरेल.'' 

Web Title: Potential antiviral treatment for covid-19 identified at science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.