मधुमेह होण्यापुर्वी शरिरात दिसतील 'हे' संकेत, वेळीच सावध व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2022 06:29 PM2022-11-09T18:29:07+5:302022-11-09T18:29:48+5:30

मधुमेह हा असा आजार आहे जो आजकाल कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो. भारतात तर मधुमेहाच्या केसेस मध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

pre-diabetes-signs-that-warns-you-to-take-care-and-change-your-lifestyle | मधुमेह होण्यापुर्वी शरिरात दिसतील 'हे' संकेत, वेळीच सावध व्हा

मधुमेह होण्यापुर्वी शरिरात दिसतील 'हे' संकेत, वेळीच सावध व्हा

Next

मधुमेह हा असा आजार आहे जो आजकाल कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो. भारतात तर मधुमेहाच्या केसेस मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. प्री डायबिटिस एखाद्या व्यक्तीसाठी तितकीच घातक ठरु शकते. अशा वेळी त्वरित जीवनशैलीत आणि आहारात बदल करणे गरजेचे आहे. प्री डायबिटिस ची अनेक लक्षणे शरिरात दिसून येतात. ते कोणते संकेत आहेत बघुया

घाम आणि चक्कर येणे

प्री डायबिटिस च्या सुरुवातीला घाम येणे, चक्कर येणे असे संकेत सतत दिसून येतात. डायबिटिसच्या वेळी शरिराचे तापमान योग्य राखणे गरजेचे आहे. मात्र ती क्षमता व्यक्तीमध्ये नसते. त्यावेळेस सतत व्यक्तीला घाम येतो. पाय सुन्न पडतात, चक्कर येते हे प्री डायबिटिसचे लक्षणे असू शकतात.

साखरेचे प्रमाण वाढणे

शरिरात साखरेचे प्रमाण वाढले तर समजुन जा हे प्री डायबिटिसचे लक्षण आहे. मात्र जीवनशैलीत बदल आणि पोषक आहार यामुळे प्री डायबिटिस बरा केला जाऊ शकतो. यामुळे हृदयासंबंधी विकारही होणार नाहीत.

स्थुलता किंवा वाढते वजन

वजन वाढणे हे साखरेचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण ठरु शकते. रक्तात ग्लुकोज प्रमाणाबाहेर वाढले तर ही समस्या उद्भवु शकते. यासाठी रोज किमान अर्धा तास चालणे गरजेचे आहे. आहेरात गाजर, पालक, मुळा यांचा समावेश करावा म्हणजे आजारापासून दूर राहाल.

Web Title: pre-diabetes-signs-that-warns-you-to-take-care-and-change-your-lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.