सावधान! 'या' ५ सवयींमुळे वेळेआधीच येऊ शकतं म्हातारपण; आजच बदला चुकीच्या सवयी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:01 PM2021-02-10T12:01:35+5:302021-02-10T12:29:30+5:30

beauty Tips in Marathi : आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनातील अशा काही सवयी सांगणार आहोत. ज्या तुम्ही आजचं बदलायला हव्यात. जेणेकरून तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसण्यासाठी स्वतःची काळजी घेऊ शकता.

Premature aging drinking through straw and other mistakes | सावधान! 'या' ५ सवयींमुळे वेळेआधीच येऊ शकतं म्हातारपण; आजच बदला चुकीच्या सवयी

सावधान! 'या' ५ सवयींमुळे वेळेआधीच येऊ शकतं म्हातारपण; आजच बदला चुकीच्या सवयी

Next

रोजच्या जगण्यातील काही चुकीच्या सवयींमुळे वयाआधीच म्हणजेच फार कमी वय असताना म्हातारे दिसू लागतात. या सवयींना वेळीच बदललं गेलं नाही तर तुम्हालाही त्वचा आणि शरीराच्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनातील अशा काही सवयी सांगणार आहोत. ज्या तुम्ही आजचं बदलायला हव्यात. जेणेकरून तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसण्यासाठी स्वतःची काळजी घेऊ शकता.

स्ट्रॉ नं पाणी पिणं-

जेव्हा आपण कोणंतही पेय स्ट्रॉने पितो तेव्हा ओठांच्या चारही बाजूंची त्वचा खेचली जाते.  त्यामुळे चेहऱ्यावर प्री मॅच्यूअर लाईन्स आणि सुरकुत्या पडू लागतात म्हणून तुम्ही ग्लास किंवा कपानं पाणी प्यायल्यास उत्तम ठरेल.

जंक फूड-

जंक फूडमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रांन्स फॅट, साखर आणि मीठ असते. त्यामुळे त्यातील पोषक तत्वाचे प्रमाण कमी होते.  जंक फूडमुळे शरीरातील कोलोजनचे प्रमाण कमी होते. कोलोजन चेहऱ्यावर तोंडावर सुरकुत्या येण्यापासून रोखण्यास फायदेशीर ठरते.  सोडा आणि  कोल्ड ड्रिंक्सच्या सेवनानं चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढतात.

दारूचे अतिसेवन

अभ्यासानुसार जे लोक जास्तीत जास्त दारूचे सेवन करतात. त्यांच्यामध्ये म्हातारपणाची लक्षणं दिसून येतात.  दारूचे अतिसेवन केल्यानं डोळ्यांखाली काळे डाग, सुरकुत्या येतात त्यामुळे डिडायड्रेशनची समस्या उद्भवते.

पुरेशी झोप न घेणं

तुम्ही त्वचेची कितीही काळजी घेत असाल तरी पुरेशी झोप घेतली नाही तर त्वचा रिपेअर होत नाही. कमीतकमी ६ तास झोप  घेतल्यानं त्वचा चांगली राहते.  त्यामुळे सुरकुत्या, डार्क सर्कल्सपासून सुटका मिळते. नॅशनल स्लीप फाउंडेशन नुसार ६ ते ७ तासांची झोप न घेतल्यानं त्वचेवर सूज आणि डार्क सर्कल्स येतात आणि स्ट्रेस हार्मोनही वाढतो.

जास्त गरम पाण्यानं अंघोळ करणं

जास्त  गरम पाण्यानं अंघोळ करणं त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. अंघोळ करण्याासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. झोपायला जाण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवायला हवा. तुम्ही दिवसभरात मेकअप करत नसाल तरी रात्री झोपताना चेहरा धुण्याची सवय लावून  घ्या. कारण झोपल्यानंतर त्वचेतील पोर्स ओपन  होतात. त्वचेवरील घाणीमुळे हे पोर्स बंद होतात. त्यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवते.  

उच्च साखरयुक्त आहाराने शरीराचं नुकसान

टफ्ट्स यूनिवर्सिटीतील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार जास्त साखरेच्या आहारामुळे शरीरात जास्त प्रमाणत टॉक्सिन्स तयार होतात.  या टॉक्सिन्समुळे विषारी पदार्थांना बाहेर टाकणारी शरीराची क्षमता कमी होते. अशा प्रकारे जास्त साखर असलेल्या आहाराचे सेवन केल्यास  दोन्ही बाजूंनी शरीरावर परिणाम होतो. या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि टफ्टस युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ऐलन टेलर यांनी सांगितले की, ''या अभ्यासात आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की, जास्त साखरेचा आहार शरीरावर कसा वाईट परिणाम करतो. ''लसीकरणानंतरही होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या कशामुळे होतोय प्रसार

जास्त साखरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं वाढत्या वयात आजारांचाही धोका वाढतो. उच्च साखरेच्या अन्नामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी  रोग, डायबिटीस आणि मॅक्‍युलर डीजेनेरेशनची समस्या उद्भवते. मॅक्यूलर डीजेनेरेशन हा एक आजार आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला अंधत्व येते. p62 नावाचे प्रोटिन्स आपल्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी शरीरात कार्य करतात. साखरेच्या आहारातमध्ये समावेश असलेले बायोप्रोडक्ट advanced glycation end products (AGEs) ला काढून टाकण्याचे कार्य करते.दातांच्या पिवळेपणामुळे चारचौघात लाज वाटतेय? मग चिंता सोडा, या घरगुती उपायांनी मिळवा चमकदार दात

(टिप : वरील सर्व दुष्परिणाम आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)

Web Title: Premature aging drinking through straw and other mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.