मीठ जास्त खाल तर अकाली मृत्यू!; तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:29 AM2022-07-14T11:29:05+5:302022-07-14T11:33:00+5:30

शिजवलेल्या अन्नात अतिरिक्त मीठ घालणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Premature death if you eat too much salt Experts warn know everything | मीठ जास्त खाल तर अकाली मृत्यू!; तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा 

मीठ जास्त खाल तर अकाली मृत्यू!; तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा 

Next

लंडन : शिजवलेल्या अन्नात अतिरिक्त मीठ घालणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. ब्रिटनमधील सुमारे ५ लाख लोकांवर केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की अन्नामध्ये अतिरिक्त मीठ टाकल्याने अकाली मृत्यूचा धोका २८ टक्क्यांनी वाढतो. 

हा अहवाल सोमवारी युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार १०० पैकी तीन लोकांचे आयुर्मान या कारणामुळे कमी होत आहे. ब्रिटनच्या बायोबँक प्रकल्पांतर्गत या रिसर्चमध्ये लोकांना अन्नाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की ते अन्नात अतिरिक्त मीठ घालतात का?  तज्ज्ञांनी सांगितले की अन्नात अतिरिक्त मीठ घालणे ही एक सामान्य सवय आहे. या सवयीचे परिणाम उशिरा दिसतात. पण, तोपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेले असते.

मिठाचे कमी प्रमाण फायदेशीर

  • अमेरिकन आरोग्य तज्ज्ञ लू यांनी सांगितले की, हा अशा प्रकारचा पहिला अभ्यास आहे.
  • जेवणातील मिठाचे प्रमाण कमी करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  ज्यांनी मीठ घालणे टाळले ते जास्त काळ जगतात.
  • यावरून आपण आपल्या खाण्याच्या सवयी सुधारल्या पाहिजेत, असे म्हणता येईल.
     

पॅक फूडमुळे जास्त धोका 
पॅकेज्ड खाद्यपदार्थ आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा घटकांमधील सोडियमचे प्रमाण मोजणे कठीण असते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये जास्त मीठ असण्याचा धोका असतो.

 

 

Web Title: Premature death if you eat too much salt Experts warn know everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न