पावसात भिजल्यानंतर सगळ्यात आधी 'हे' काम कराल; तरच आजारांपासून लांब राहाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 07:04 PM2020-06-25T19:04:49+5:302020-06-25T19:08:44+5:30
पावसाळ्यात भिजल्यानंतर आजारी पडण्याची वेळ येऊ नये. यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत.
सध्या पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे अनेक आजारांची लागण होण्याची शक्यता असते. दरवर्षी पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला हे आजार उद्भवतात. पण यंदा कोरोनाच्या माहामारीशी देश लढत असल्यामुळे सगळयांमध्येच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. साधा ताप असेल तरी कोरोनाची लक्षणं असल्याप्रमाणे लोकांना भीती वाटते. पावसाळ्यात भिजल्यानंतर आजारी पडण्याची वेळ येऊ नये. यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत.
पावसात भिजल्यानंतर, सर्दी, खोकला, फ्लू असे आजार उद्भवण्याची शक्यता असते. पावसात भिजल्यानंतर लगेचच कपडे बदला. कारण ओल्या कपड्यांमुळे सर्दी होण्याची शक्यता असते. त्यासाठी पावसात भिजल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करा. पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओले शुज पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलणं गरजेचं आहे. शक्यतो पावसात भिजणे टाळावे.
आंबट कमी असलेले जेवण करावे. लोणचं, दही, अतितिखट पदार्थांचा समावेश आहारात करू नये. गरम चहा, सूप, गरम पाण्याचे सेवन करा. पावसाळ्यात पचन न होणारा आहार घेतल्यास शारीरिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते. त्यासाठी थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फुड हे पदार्थ खाणे टाळावे. पचायला हलके आणि उष्ण पदार्थ शक्यतो घ्या.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करणे. घरात किंवा परिसरात स्वच्छता ठेवणे. तसेच डास प्रतिबंधक औषधे, जाळ्या यांचा वापर करा. घरातील कुंडीत, डबक्यात पाणी साचू देऊ नका. बाहेरून आल्यानंतर ताबडतोब कपडे धुण्यास टाका, कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करत राहा. शक्यतो वॉशेबल मास्कचा वापर करा. जेणेकरून स्वच्छ करण्यास सोपे जाईल.
CoronaVirus : बापरे! पहिल्यांदाच समोर आला कोरोना विषाणूचा 'असा' प्रकार; डॉक्टरही हैराण
धक्कादायक! ताण तणाव जास्त असल्यास वाढतो कोरोनाच्या संक्रमणाचा धोका, तज्ज्ञांचा खुलासा