टाच दुखीने हैराण आहात का?; आधी योग्य कारण ओळखा मगच उपाय करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 04:03 PM2019-09-24T16:03:10+5:302019-09-24T16:16:05+5:30

आपल्या आजूबाजूला आपण खूप जणं टाचदुखीच्या त्रासानी हैराण झालेले बघतो. सकाळी उठल्यावर पहिलं पाऊल टाकलं की मस्तकात जाणारी कळ आणि थोडं चालल्यावर दुखणं कमी होणं हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे.

Prevention and treatment how to deal plantar fasciitis or heel pain | टाच दुखीने हैराण आहात का?; आधी योग्य कारण ओळखा मगच उपाय करा

टाच दुखीने हैराण आहात का?; आधी योग्य कारण ओळखा मगच उपाय करा

googlenewsNext

- डॉ. नेहा पाटणकर

मधुरा आणि तिची मुलगी सिया गणपतीच्या दर्शनाला मंडपात शिरल्या आणि बाहेर पडल्यावर बघितलं तर मधुराच्या सॉफ्ट soles असलेल्या sandals गायब होत्या आणि तिथे कोणीतरी उंच टाचेच्या चपला ठेवून गेलं होतं.

मधुराची खूप चिडचिड झाली पण मग तिला वाटलं बरंच झालं नाहीतरी त्या जरा सैलच होत होत्या. चालताना पाय आतल्या आत थोडासा हलत होता. एका बाजूला थोड्याशा झिजायलाही लागल्या होत्या. तिची मुलगी रिया तिला म्हणाली,"ज्या high heel वाल्या बाईनी तिच्या चपला ठेवल्या आहेत तिलाही तुझ्याच सारखा टाचदुखीचा त्रास होत असणार!!!!!

आपल्या आजूबाजूला आपण खूप जणं या त्रासानी हैराण झालेले बघतो. सकाळी उठल्यावर पहिलं पाऊल टाकलं की मस्तकात जाणारी कळ आणि थोडं चालल्यावर दुखणं कमी होणं हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. काही जणांना खूप उभं राहिलं तर किंवा काहींना खूप वेळ बसून उठताना त्रास होतो.

याला डॉक्टरी परिभाषेत "Plantar Fasciatis" म्हणतात. हा fascia टाचेपासून बोटापर्यंत असणारा connective tissue चा पट्टा असतो. टाचेच्या हाडांवर अतिरिक्त ताण आल्याने, खूप जास्त वापर झाल्याने, टाचेखालचं फॅटचं पॅड झिजल्याने, पोटरीचे स्नायू खूप tight असल्याने हा पट्टा झिजतो, काही ठिकाणी पातळ होतो, फाटतो त्याच्या या inflammation लाच "plantar fascitis"म्हणतात.

याच्यासाठी टाचेखाली बॉल घेऊन फिरवला की दुखणं कमी होतं.

टाचदुखीची कारणं आणि उपचार

1) टाचेखालचं फॅट पॅड झिजल्याने त्या ठिकाणी heel spurs तयार होतात. त्यासाठी cushions/heel support मुळे दुखणं आटोक्यात येतं.

2) फ्लॅट फूट म्हणजे पावलांचा धनुष्यासारखा आकार नसणे यामुळे चालण्याच्या शैलीने एकाच ठिकाणी ताण येतो. यासाठी चपला/बुटांमध्ये आतून supoorter लावावा लागतो.

3) पोटरीचे स्नायू खूप कडक (tight) असल्यामुळे किंवा अति/चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे त्रास होतो. त्यासाठी काही muscle stretching चे व्यायाम अत्यंत उपयुक्त ठरतात.

4) सैल किंवा घट्ट चपला किंवा बूट घातले तर चालताना एकाच जागी जास्त ताण) येतो, चालण्याची ढब बदलते.

5) अतिरिक्त वजन असलेल्यांच्यात या आजाराचं प्रमाण अर्थातच जास्त आहे. त्यासाठी वजन आटोक्यात ठेवणे हे खूपच महत्वाचे ठरते.

6) उंच टाचेच्या चपला घालण्याची हौस म्हणजे पायाच्या आजारांना निमंत्रणच आहे. टाचेची झीज होणे, पोटरीच्या स्नायूंवर ताण पडणे आणि plantar fascia खूप जास्त ताणला जाणे या सगळ्याच गोष्टी एकत्रित परिणाम करतात.

म्हणजेच टाचदुखी झाली तर तिचं मूळ कारण शोधून उपाय केला तर त्याचा अचूक उपयोग होतो. आपण कोणत्या प्रकारचे बूट/चप्पल/sandals वापरतो याचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. फक्त matching आहे, छान सुबक आहे, सध्या फॅशन आहे, म्हणून कोणत्याही प्रकारची पादत्राणे घालणं महागात पडू शकतं.

Web Title: Prevention and treatment how to deal plantar fasciitis or heel pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.