डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे काय असतात? दुर्लक्ष कराल तर पडेल महागात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 10:11 AM2020-01-18T10:11:43+5:302020-01-18T10:16:31+5:30
भारतात डायबिटीसने ग्रस्त रूग्णांची संख्या लागोपाठ वाढत आहे. अनेकदा या रोगाची माहिती शारीरिक समस्या झाल्यावर मिळते, पण काही शारीरिक लक्षणे अशी असतात.
भारतात डायबिटीसने ग्रस्त रूग्णांची संख्या लागोपाठ वाढत आहे. अनेकदा या रोगाची माहिती शारीरिक समस्या झाल्यावर मिळते, पण काही शारीरिक लक्षणे अशी असतात, ज्यांनी हा इशारा मिळतो की, भविष्यात तुम्हाला डायबिटीस होण्याचा धोका वाढू शकतो. अशाच काही लक्षणांबाबत तुम्हाला माहिती असली पाहिजे. अशात लवकरात लवकर ब्लड टेस्ट करून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्हाला डायबिटीस आहे किंवा नाही.
डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे
(Image Credit : diabetes.ie)
१) जर तुम्हाला पुन्हा-पुन्हा लघवीला जाण्याची असेल तर होऊ शकतं की, तुमच्या शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढलं असेल. या समस्येत लघवी लवकर लवकर येते. जेव्हा शरीरात शुगर अधिक प्रमाणात जमा होतं, तेव्हा लघवीच्या माध्यमातून बाहेर येतं.
२) ब्लड शुगर वाढल्यावर तहानही अधिक लागते. जर तुम्हाला पुन्हा पुन्हा तहान लागत असेल तर एकदा डॉक्टरांशी याबाबत बोला. अनेकदा ब्लड शुगर वाढल्यानेही भूक अधिक लागते. जर तुम्हीही आधीपेक्षा अधिक खाऊ लागले असाल तर शुगर लेव्हल टेस्ट नक्की करा.
३) तुमचं वजन व्यवस्थित असेल आणि अचानक कमी होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. जर तुम्हाला भूकही अधिक लागत असेल आणि त्यानुसार तुम्ही खात असाल तर वजन कमी होता कामा नये. अशात बरं होईल की, तुम्ही शारीरिक चेकअप करवून घ्या.
४) रात्री आठ तास झोप घेऊनही तुम्हाला दिवसभर थकवा वाटत असेल किंवा आळस जाणवत असेल ही चिंतेची बाब आहे. अशावेळी तुम्ही डायबिटीसची टेस्ट केली पाहिजे. सोबतच कामात लक्ष न लागणे, एकाग्रता कमी होणे हे सुद्धा ब्लड शुगर लेव्हल वाढण्याकडे इशारा करतात.
५) तुम्हाला हे माहीत आहे का की, डायबिटीसचा प्रभाव सर्वातआधी आणि सर्वात जास्त डोळ्यांवर पडतो? याकडे दुर्लक्ष कराल तर तुम्हाला धुसर दिसण्याची समस्याही होऊ शकते. जर एखादी जखम झाली किंवा कापलं असेल आणि या जखमा वेळीच ठिक होत नसेल तर हा डायबिटीसचा संकेत असू शकतो. डायबिटीस असेल तर पुरळ, पिंपल्स, ब्लॅकहे़ड्स अधिक येऊ लागतात.