डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2016 01:02 PM2016-10-13T13:02:23+5:302016-10-16T14:55:51+5:30

बऱ्याचजणांना डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतात. बऱ्याच उपचारानंतरदेखील ती काळी वर्तुळे जात नाहीत.

The problem of black circles under the eyes | डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या

Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">बऱ्याचजणांना डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतात. बऱ्याच उपचारानंतरदेखील ती काळी वर्तुळे जात नाहीत. त्यामुळे आपल्या सौंदर्यावर त्याचा परिणाम होऊन काही अंशी न्यूनगंड निर्माण होतो. आपणास रात्री उशिरापर्यंत काम करण्याची सवय असेल, तर त्यामुळे झोप अपूर्ण होते किंवा मद्यसेवनामुळे झालेले जागरण यामुळे आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात. याचबरोबर काळी वर्तुळे वाढण्यासाठी अजून बरेचसे घटक कारणीभूत आहेत.
 
डोळ्यांखालची वर्तुळे कशी काढाल?
डोळ्यांभोवतीच्या भागातील त्वचा ही शरीराची सर्वात पातळ त्वचा असते, तसेच याच भागात त्वचेचा अत्यंत नाजूक थर देखील असतो. या भागात अत्यंत निमुळत्या रक्तवाहिन्या आणि धमन्या असतात. या धमन्यांमध्ये प्राणवायू युक्त आणि प्राणवायुरहीत रक्त असतं. पातळ त्वचेमुळे गडद रंगाचे रक्त दिसून येते. त्यामुळेच सकाळच्या वेळी काळी वर्तुळे अधिक स्पष्ट दिसतात. 
लाल रक्तपेशींची या निमुळत्या असलेल्या धमन्यांमधून गळती होते. या लाल रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिनचे शरीराच्या सुरक्षा यंत्रणेद्वारे हेमोसिडेरिन या गडद रंगांच्या रंगद्रव्यात विभाजन होते. हे रंगद्रव्य पातळ त्वचेमधून दिसू लागते आणि त्यामुळे काळी वर्तुळे तयार होतात.
* अ‍ॅलजीमुर्ळे डोळ्याभोवती सूज येते. डोळे पुन्हा पुन्हा चोळल्यामुळे धमन्यांना इजा पोहोचून लाल रक्तपेशींची गळती सुरू होते.
* काळी वर्तुळे ही कित्येकदा अनुवांशिक असू शकतात. अनुवांशिक असल्यामुळे अशा कुटुंबांतील व्यक्तींमध्ये खूप लवकर काळी वर्तुळे दिसू लागतात.
* थकवा किंवा अपुरी विश्रांती
* अपुरे पोषण
कॉस्मॅटिक सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर पूर्ण उपचार केले जातात. शस्त्रक्रिया करून आणि विना-शस्त्रक्रिया अशा दोन्ही उपचार पद्धती उपलब्ध आहेत. यातील शस्त्रक्रिया वापरून केलेली उपचार पद्धती आधुनिक आहे.
 

Web Title: The problem of black circles under the eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.