बद्धकोष्ठतेची समस्या आहे? 'हे' आर्युवेदिक उपाय देतील त्वरित दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 03:33 PM2021-06-15T15:33:28+5:302021-06-15T15:34:18+5:30

पोटाच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने बद्धकोष्ठतेसारखे आजार उद्भवतात. आयुर्वेदानुसार, चुकीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची तक्रार उद्भवू शकते. पाहुयात यावरील आर्युवेदिक उपाय.

Problems with constipation? 'These' Ayurvedic remedies will give immediate relief | बद्धकोष्ठतेची समस्या आहे? 'हे' आर्युवेदिक उपाय देतील त्वरित दिलासा

बद्धकोष्ठतेची समस्या आहे? 'हे' आर्युवेदिक उपाय देतील त्वरित दिलासा

googlenewsNext

आपल्या शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी आपलं पोट नेहमी साफ आणि चांगले असणे खूप महत्वाचे आहे. मात्र पोटाच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने बद्धकोष्ठतेसारखे आजार उद्भवतात. आयुर्वेदानुसार, चुकीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची तक्रार उद्भवू शकते. ज्या लोकांना बद्धकोष्ठता त्रास आहे त्यांनी दररोज योग्य आहार घेतला पाहिजे. तसंच बर्‍याच वेळा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बद्धकोष्ठतेने ग्रस्त रूग्णांसाठी कोणते आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरतील हे जाणून घेऊया.


 बेल
तज्ज्ञांच्या मते, बेल पोटाला थंड ठेवतं आणि त्यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यासाठी मदत करतात. तुम्हाला हवं असल्यास बेलच्या प्लपचंही सेवन करू शकता. याचं तुम्ही सरबतही करू शकता.


त्रिफळं
हे असे आयुर्वेदिक औषध आहे ज्याचा उपयोग करून अनेक आरोग्यविषयक समस्यांवर मात करता येते. तसंच हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यात प्रभावी असल्याचं सिद्ध आहे. तसेच यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. एक कप गरम पाण्यात एक चमचा त्रिफळं १० मिनिटं ठेवा. त्यानंतर फिल्टर करून हे पाणी प्यावं. असे केल्यास बद्धकोष्ठता दोन आठवड्यात बरी होते.


अंजीर
अंजीरात सॉल्यूबल फायबर असतं. जे शौचाची प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करतं. यासह, त्याचं सेवन पोट साफ करतं. अंजीर रात्रभर पाण्याच भिजवून ठेवल्यावर सकाळी त्यांचं सेवन करा. असं केल्यास बद्धकोष्ठतेने ग्रस्त रूग्णांना दिलासा मिळेल.


बडीशेप
बडीशेपमध्ये अँटी-इंफ्लेमेट्री घटक असतात. ज्याचा उपयोग पोटा संबंधित समस्या दूर करण्यात होतो. याव्यतिरिक्त, यामध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या रुग्णांना आराम मिळेल. आरोग्य तज्ञांच्या मते, बद्धकोष्ठता आणि इतर पोटात संबंधित समस्या जसं की गॅस आणि ओटीपोटात सूज येणं अशा तक्रारी असणाऱ्यांना बडीशेपचा चहा फायदेशीर ठरतो.


 

Web Title: Problems with constipation? 'These' Ayurvedic remedies will give immediate relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.