Diabetes tips: प्रोसेस्ड फुड खाल्ल्याने डायबिटीस रुग्णांना 'या' आजाराचा धोका सर्वाधिक, संशोधनात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 01:28 PM2022-03-18T13:28:58+5:302022-03-18T13:30:02+5:30

मधुमेह असलेल्या ४६४२ लोकांच्या डेटाचे विश्लेषण करून हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका निश्चित केला. यादरम्यान, त्यांना असं आढळून आलं की, निर्धारित आहार चक्राचे पालन करणाऱ्या मधुमेही रुग्णांमध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे.

processed food is harmful for diabetes patient as it can cause heart attack | Diabetes tips: प्रोसेस्ड फुड खाल्ल्याने डायबिटीस रुग्णांना 'या' आजाराचा धोका सर्वाधिक, संशोधनात दावा

Diabetes tips: प्रोसेस्ड फुड खाल्ल्याने डायबिटीस रुग्णांना 'या' आजाराचा धोका सर्वाधिक, संशोधनात दावा

Next

मधुमेहाच्या रुग्णांसाठी अन्नाचे प्रमाण आणि कॅलरीज(Calories)प्रमाणेच जेवणाची वेळही खूप महत्त्वाची असते. संशोधकांचे म्हणण्यानुसार, माणसाच्या जेवणाची वेळ बायोलॉजिकल क्लॉक (biological clock) प्रमाणे असावी. बायोलॉजिकल क्लॉक ही एक नैसर्गिक आणि अंतर्गत प्रक्रिया आहे, ज्याद्वारे झोप आणि जागृत होण्याचे चक्र नियंत्रित राहतं आणि दर २४ तासांनी त्याची पुनरावृत्ती होते.

संशोधनानुसार, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यास मधुमेहींचे आरोग्य सुधारू शकते. चीनमधील हार्बिन मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (Harbin Medical University) संशोधकांनी नॅशनल हेल्थ अँड न्यूट्रिशन टेस्टिंग सर्व्हेमधून (National Health and Nutrition Testing Survey) मधुमेह असलेल्या ४६४२ लोकांच्या डेटाचे विश्लेषण करून हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका निश्चित केला. यादरम्यान, त्यांना असं आढळून आलं की, निर्धारित आहार चक्राचे पालन करणाऱ्या मधुमेही रुग्णांमध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे.

या अभ्यासाचा निष्कर्ष 'द जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी आणि 'द जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजी अँड मेटाबॉलिझम' मध्ये (The Journal of Clinical Endocrinology & Metabolism) प्रकाशित झाले आहेत. हार्बिन मेडिकल युनिव्हर्सिटीच्या किंगराव सोंग यांनी सांगितलं की, अभ्यासात आम्हाला आढळून आलं की, सकाळी बटाटे, दुपारी संपूर्ण धान्य आणि संध्याकाळी हिरव्या भाज्या, दूध आणि कमी प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने मधुमेही रुग्णांचे आयुष्य अधिक वाढू शकते. ते पुढे म्हणाले, "मधुमेहासाठी पोषक मार्गदर्शक तत्त्वे आणि हस्तक्षेप धोरणे भविष्यात अन्नपदार्थांसाठी इष्टतम वापराच्या वेळेस म्हणजे ऑप्टिमल कंस्प्शन दरम्यान एकत्रित करणं आवश्यक आहे."

संशोधकांना त्यांच्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, मधुमेह असलेल्या लोकांमध्ये सकाळी बटाटे किंवा पिष्टमय भाज्या, दुपारी संपूर्ण धान्य आणि संध्याकाळी हिरव्या भाज्या, ब्रोकोली आणि दूध सारख्या गडद भाज्या खाल्ल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे. तसेच ज्या लोकांनी संध्याकाळी भरपूर प्रक्रिया केलेले प्रोसेस्ड फूड खाल्ले त्यांच्या हृदयरोगाने मृत्यू होण्याची शक्यता जास्त होती.

Web Title: processed food is harmful for diabetes patient as it can cause heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.