पिज्जा, बर्गर अन् केक आवडीनं खात असाल तर वेळीच सावध व्हा; समोर आले 'हे' साईड इफेक्ट्स

By manali.bagul | Published: January 11, 2021 11:36 AM2021-01-11T11:36:58+5:302021-01-11T11:42:17+5:30

Side Effects of fast Food : साधारणपणे प्रोसेस्ड फूड शरीरासाठी चांगले नसते असा अनेकांचा समज आहे काही लोक अल्ट्रा प्रोसेस्ट फूड म्हणजेच पिज्जा, बर्गर आणि केक असे पदार्थ अति प्रमाणात खातात. 

Processed foods can cause heart diseases premature death- Reserch | पिज्जा, बर्गर अन् केक आवडीनं खात असाल तर वेळीच सावध व्हा; समोर आले 'हे' साईड इफेक्ट्स

पिज्जा, बर्गर अन् केक आवडीनं खात असाल तर वेळीच सावध व्हा; समोर आले 'हे' साईड इफेक्ट्स

Next

कोरोनाच्या प्रसारामुळे प्रत्येकालाच आधीपेक्षा जास्त स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला  हवं. आपली  जीवशैली आणि आहार घेण्याची पद्धत यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. फिट आणि निरोगी  राहण्यामागे आहाराची खूप महत्वाची भूमिका असते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. साधारणपणे प्रोसेस्ड फूड शरीरासाठी चांगले नसते असा अनेकांचा समज आहे काही लोक अल्ट्रा प्रोसेस्ट फूड म्हणजेच पिज्जा, बर्गर आणि केक असे पदार्थ अति प्रमाणात खातात. 

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित  झालेल्या एका रिसर्च नुसार अल्ट्रा प्रोसेस्ट फूड खराब होऊ नये म्हणून अतिरिक्त केमिकल आणि साखर मिसळली जाते. ज्यामुळे हृदयाच्या  रोगांचा धोका वाढू शकतो. अकाली मृत्यूंचे प्रमाण सुद्धा यामुळे वाढण्याची शक्यता असते. इंसायडरच्या एका रिपोर्ट्नुसार इटलीतील संशोधकांनी  ३५ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या  २४ हजार ३२५ महिला आणि पुरूषांचे  १० वर्षांपर्यंत अध्ययन केले. यादरम्यान त्यांनी खाण्यापिण्याच्या सवयी आणि आरोग्यावर होणारा परिणाम यांवर अभ्यास केला होता. 

हृदयाचे आजार आणि अकाली मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ

या संशोधनात दिसून आलं की, ज्या लोकांना जास्त प्रमाणात अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाण्याची सवय होती. त्यांच्यात हृदयाचे आजार,  हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका जास्त वाढला होता. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाण्यामुळे कॅलरीज १५ टक्क्यांनी वाढल्या होत्या. या गटामध्ये सहभागी असलेल्या ५८ टक्के लोकांमध्ये हृदयाच्या रोगांचा धोका असल्याचे दिसून आले होते. याव्यतिरिक्त  ५२ टक्के लोकांना स्ट्रोक किंवा सेरेब्रोवास्कुलर आजारांमुळे मृत्यूचा सामना करावा लागला होता. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड जास्त  स्वादिष्ट  असतात. त्यामुळे भूक जास्त लागल्यास आपण  जास्त प्रमाणात या पदार्थाचे सेवन करतो. त्यामुळे वजनदेखील वाढतं. 

३० वर्षांआधीच्या तुलनेत बर्गर झालं अधिक अनहेल्दी

गेल्या ३० वर्षात फास्ट फूड आरोग्यासाठी अधिक जास्त घातक झाले आहेत. हा रिसर्च अमेरिकन बोस्टन यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी केला होता. यात १९८६ पासून ते २०१६ दरम्यान अमेरिकेच्या प्रसिद्ध फूड चेनमध्ये मिळणाऱ्या फास्ट फूडची तुलना केली गेली होती. यातून समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. 

बर्गरमध्ये मीठ वाढलं

बर्गर, बरीटो आणि याचप्रकारच्या फास्ट फूडमध्ये मिठाचं प्रमाण फार जास्त वाढलं आहे. हे १९८६ मध्ये दिवसभराच्या गरजेच्या केवळ २७.८ टक्के असायचं. २०१६ मध्ये हे ४.६ टक्के दराने वाढून ४१.६ टक्के इतकं झालं आहे. याची साइज आणि कॅलरी काउंट सुद्धा २४ टक्क्यांनी वाढलं, म्हणजे दर १० वर्षांनी १३ ग्रॅम. 

अलर्ट! आता भारतातही वेगानं होतोय बर्ड फ्लूचा प्रसार; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

गोडवा सुद्धा वाढला

फास्ट फूड म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या गोड पदार्थांच्या वजनातही वाढ झाली आहे. दर १० वर्षांनी याचं वजन २४ ग्रॅमच्या दराने वाढलं आहे. कॅलरी काउंटही दर १० वर्षात ६२Kcal वाढला आहे. 

चिप्सची साइजही वाढली

फ्रेन्च फ्राइज आणि चिप्ससारखे साइड डिश म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या फास्ट फूडमध्ये मीठ १०० टक्के वाढलं आहे. हे दिवसभराच्या गरजेच्या ११.६ टक्के वाढून २३.२ टक्के झालं आहे. याचा कॅलरी काउंट २४ टक्क्यांनी वाढला आहे. 

सावधान! इम्युनिटीसाठी व्हिटामीन्सच्या गोळ्या घेताय; तर 'हे' ५ साईड इफेक्ट्स माहीत करून घ्या

तसा तर हा रिसर्च अमेरिकेत करण्यात आला होता. अमेरिकेत आज ४० टक्के लोक जाडेपणाने ग्रस्त आहेत. तर १९६० च्या दशकात केवळ १३ टक्के लोकसंख्या जाडेपणाने ग्रस्त होती. भारतात फास्ट फूडचा आकार आणि वजन अमेरिका व यूरोपच्या देशां इतका नाही. तरी सुद्धा इथे २००५-०६ ते २०१५-१६ दरम्यान जाड लोकांची संख्या दुप्पट झाली आहे. 

Web Title: Processed foods can cause heart diseases premature death- Reserch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.