प्रोस्टेस्ट ग्रंंथीची वाढ ठरु शकते गंभीर, आजच जाणून घ्या लक्षणं, कारणं अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 08:39 PM2021-08-24T20:39:32+5:302021-08-24T22:17:31+5:30

लघवीच्या थैलीतून निघणारा मूत्रमार्ग (युरेथ्रा) प्रोस्टेट ग्रंथीच्या मधून जात असतो. ही ग्रंथी मोठी झाली की, मूत्रमार्गावर दाब येतो. त्यामुळे लघवीचा वेग कमी होतो. सोबतच लघवीच्या पिशवीवरही दाब येतो.

prostate gland enlargement symptoms, reasons, remedies in men | प्रोस्टेस्ट ग्रंंथीची वाढ ठरु शकते गंभीर, आजच जाणून घ्या लक्षणं, कारणं अन् उपाय

प्रोस्टेस्ट ग्रंंथीची वाढ ठरु शकते गंभीर, आजच जाणून घ्या लक्षणं, कारणं अन् उपाय

googlenewsNext

पुरुषांमध्ये लघवीच्या पिशवीच्या खाली प्रोस्टेट ग्रंथी असते. त्यास पौरुष ग्रंथी असेही म्हणतात. पुरुषांच्या शरीरातून टेस्टॉस्टरॉन हे संप्रेरक स्त्रवत असते. त्याच्या प्रभावामुळे आणि जसजसे वय वाढते ही ग्रंथी मोठी होत जाते. लघवीच्या थैलीतून निघणारा मूत्रमार्ग (युरेथ्रा) प्रोस्टेट ग्रंथीच्या मधून जात असतो. ही ग्रंथी मोठी झाली की, मूत्रमार्गावर दाब येतो. त्यामुळे लघवीचा वेग कमी होतो. सोबतच लघवीच्या पिशवीवरही दाब येतो.

याची लक्षणे काय?
प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे होणारा त्रास हा दोन कारणांनी असतो. एक म्हणजे वाट अडकल्यामुळे आणि दुसरे म्हणजे लघवीच्या पिशवीवर अधिक ताण (प्रेशर) निर्माण झाल्यामुळे. अधिक ताण पडल्यामुळे वारंवार लघवीला जावे लागणे, लघवी रोखता न येणे, रात्रीस लघवीची वारंवारता वाढणे अशी लक्षणे दिसून येतात. वाट अडकल्यामुळे लघवी नीट न होणे, कधी-कधी लघवी पूर्ण थांबून जाणे, लघवी झाल्यानंतरही थेंब थेंब लघवी होत राहणे, कधी-कधी छोटे खडे बाहेर पडणे ही लक्षणे आढळून येतात. याशिवाय प्रोस्टेट वाढल्याने मुत्रपिंड निकामे होणे, हात-पाय- चेहऱ्यावर सुज येणे, रक्त जाणे अशा समस्या निर्माण होतात.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय करावे?

  • चहा, कॉफी व मद्यसेवन टाळणे.
  • ज्यांना जोखीम आहे त्यांनी रात्री आठनंतर पाणी न पिणे.
  • दिवसभर लघवी न रोखणे.
  • नियमित व्यायाम करणे.
  • बद्धकोष्ठता टाळणे.
  • चिंता व ताणरहीत जगणे.

हे लक्षात ठेवा
एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे, की प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीकडे दुर्लक्ष करता कामा नये. या ग्रंथीच्या वाढीमुळे मूत्रवाहिनीवर दाब येऊन मूत्रवहनात अडथळे निर्माण होतात, त्याचा एक परिणाम म्हणून मूत्राशयात खडे होण्याची शक्‍यता वाढू लागते. प्रॉस्टेट ग्रंथी वाढल्याने मूत्रनलिकेतील रक्तवाहिन्या रुंदावतात, त्या फुटू शकतात व लघवीतून रक्त जाऊ लागते. लघवी बाहेर पडण्याला येणारा अडथळा वाढत जातो. अखेर मूत्रपिंडावर त्याचा दुष्परिणाम होऊ लागतो व मूत्रपिंडाचे कार्य नीट होईनासे होते. अखेर मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात. 

Web Title: prostate gland enlargement symptoms, reasons, remedies in men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.