Protein Deficiency : हे संकेत सांगतात तुमच्या शरीराला मिळत नाहीये पुरेसं प्रोटीन, करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 09:48 AM2023-02-27T09:48:11+5:302023-02-27T09:49:46+5:30

Protein Deficiency : शरीरात प्रोटीन कमी झालं तर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही अशा काही संकेतांबाबत सांगणार आहोत जे नेहमीच शरीरात प्रोटीन कमी झाले की दिसतात.

Protein Deficiency : Signs and symptoms you are not getting enough protein | Protein Deficiency : हे संकेत सांगतात तुमच्या शरीराला मिळत नाहीये पुरेसं प्रोटीन, करू नका दुर्लक्ष

Protein Deficiency : हे संकेत सांगतात तुमच्या शरीराला मिळत नाहीये पुरेसं प्रोटीन, करू नका दुर्लक्ष

googlenewsNext

Protein Deficiency :  प्रोटीन एक मायक्रोन्यूट्रिएंट असतं जे अमीनो अ‍ॅसिडसोबत मिळून तयार होतं. शरीर व्यवस्थि चालण्यासाठी अनेक पोषक तत्वांची गरज असते, त्यातील एक म्हणजे प्रोटीन. प्रोटीन शरीरासाठी फार महत्वाचं मानलं जातं. हे मांसपेशींसाठी बिल्डींग बॉक्ससारखं काम करतं. प्रोटीनमुळे मांसपेशींना मजबूती तर मिळतेच, सोबतच शरीराला ऊर्जा देतं आणि हार्मोन्सही नियंत्रित करतं. शरीरात प्रोटीन कमी झालं तर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही अशा काही संकेतांबाबत सांगणार आहोत जे नेहमीच शरीरात प्रोटीन कमी झाले की दिसतात.

कमजोरी, मसल लॉस आणि थकवा - शरीरात प्रोटीनची कमतरता झाली की, कमजोरी, थकवा आणि मसल लॉसचा सामना करावा लागतो. याचं कारण शरीरात जर प्रोटीनचं प्रमाण कमी झालं तर शरीर ते भरून काढण्यासाठी मांसपेशींमधून प्रोटीन घेतं. त्यामुळे पुढे जाऊन मासपेशींचं नुकसान होतं. त्यानंतर हळूहळू शरीराची ताकद कमी होऊ लाते आणि मेटाबॉलिज्मही स्लो होऊ लागतं. याच कारणाने कमजोरी आणि थकवा येऊ लागतो.

जखम लगेच बरी न होणे - जर तुम्ही एखाद्या कारणाने जखम झाली असेल किंवा एखादं ऑपरेशन झालं असेल, ही जखम जर अजूनही भरली नसेल तर शरीरात प्रोटीनची कमतरता असू शकते. शरीरात प्रोटीन कमी असलं तर कोणतीही जखम भरण्यास वेळ लागतो. याच कारणाने नवीन कोशिका तयार होण्यासही वेळ लागतो. ज्यामुळे जखम भरणं अवघड होतं.

भूक जास्त लागणं - जर तुम्हाला जेवण केल्यानंतर भूक लागत असेल किंवा सतत काहीतरी खाण्याचं मन होत असेल तर हा शरीरात प्रोटीनची कमतरता असल्याचा संकेत असू शकतो. प्रोटीन एक असं मायक्रोन्यूट्रिएंट असतं जे तुमचं पोट जास्त वेळ भरून ठेवतं. पण डाएटमध्ये प्रोटीनची कमतरता असेल तर तुम्हाला सतत भूक लागल्याची जाणीव होत राहते.

इम्यूनिटी कमजोर होणं - शरीरात प्रोटीनची कमतरता झाली तर तुम्ही सतत आजारी पडू शकता. इम्यूनिटी सिस्टीमसाठी प्रोटीन फार गरजेचं असतं. याने बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून बचाव करण्यास तुम्हाला मदत मिळते. त्याशिवाय इम्यून सेल्स अमीनो अ‍ॅसिडपासून तयार होतात, जे एकप्रकारचं प्रोटीनच असतं. अशात प्रोटीनचं सेवन योग्य प्रमाणात केलं तर शरीर व्हायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून वाचतं.

केस, त्वचा आणि नखांमध्ये समस्या - शरीरात प्रोटीन कमी झालं तर याचा प्रभाव नखं, त्वचा आणि केसांवरही बघायला मिळतो. प्रोटीनची कमतरता झाल्यावर कमजोर नखं, कोरडी त्वचा आणि केस पातळ होण्याची समस्या होते. कारण केस, त्वचा आणि नखं काही खास प्रोटीन जसे की, इलास्टिन, कोलेजन आणि केराटिनने मिळून बनलेले असतात. त्यामुळे शरीरात प्रोटीनची कमतरता झाली तर त्याचा प्रभाव नखं, त्वचा आणि केसांवर बघायला मिळतो.

Web Title: Protein Deficiency : Signs and symptoms you are not getting enough protein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.