प्राचीन काळापासून औषधांमध्ये वापरली जाणारा 'हा' मसाला, अनेक गंभीर आजारांवर उत्तम उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 04:50 PM2022-09-16T16:50:18+5:302022-09-16T17:06:50+5:30

प्राचीन काळी, ग्रीक आणि इजिप्शियन लोक पुदिना हजारो वर्षे औषध म्हणून वापरत होते. नंतर ती एक विशेष प्रजाती म्हणून ओळखली जाऊ लागली.

pudina or mint benefits | प्राचीन काळापासून औषधांमध्ये वापरली जाणारा 'हा' मसाला, अनेक गंभीर आजारांवर उत्तम उपाय

प्राचीन काळापासून औषधांमध्ये वापरली जाणारा 'हा' मसाला, अनेक गंभीर आजारांवर उत्तम उपाय

googlenewsNext

पुदिना आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पुदिना अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पुदिन्यामध्ये अनेक चमत्कारिक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अॅसिडिटी, अपचन यांसारखे आजार क्षणात बरे होतात. प्राचीन काळी, ग्रीक आणि इजिप्शियन लोक पुदिना हजारो वर्षे औषध म्हणून वापरत होते. नंतर ती एक विशेष प्रजाती म्हणून ओळखली जाऊ लागली.

पुदिन्याची पाने अनेक प्रकारे वापरता येतात. तुम्ही चहामध्ये पुदिन्याची पाने वापरू शकता किंवा कॅप्सूल म्हणून घेऊ शकता. याशिवाय त्याची ऑईल कॅप्सूलही वापरता येते. याचा वापर तुम्ही सौंदर्य टिकवण्यासाठीही करू शकता. तुम्ही ते तुमच्या त्वचेवरही वापरू शकता. चेहऱ्यावर वापरताना, हे लक्षात ठेवले पाहिजे की फक्त काही थेंब वापरावेत. एकाच वेळी जास्त तेल लावणे हानिकारक ठरू शकते.

पोटदुखीत आराम -
पुदीना काही वेळा पोटाशी संबंधित आजारांमध्येही खूप आराम देतो. काही संशोधनात असे समोर आले आहे की, पुदिना लहान मुलांमधील पोटदुखी कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. मळमळ आणि उलट्यांचा त्रास कमी करण्यासाठी देखील वापरले जाते.

डोकेदुखीवर आराम -
पुदिन्यात मेन्थॉल असते. पुदिन्याच्या गुणधर्मांवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ते मायग्रेन डोकेदुखीमध्ये देखील आराम देते. पुदिन्याच्या तेलाने कपाळाला मसाज केल्याने तीव्र वेदनांमध्येही आराम मिळतो.

तोंडातील जंतू नष्ट करण्यासाठी -
पुदिना केवळ तोंड फ्रेश ठेवण्यासाठीच उपयुक्त नाही तर तोंडाच्या आत असलेल्या जंतूंचा खात्मा करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामुळे दातांवर बॅक्टेरिया तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच्या वापराने दातांची चमक देखील वाढते.

बदलत्या ऋतूत कफ होण्यापासून सुटका -
ऋतू बदलत असताना सर्दी आणि कफ होण्याची समस्या असल्यास पुदीन्यामुळेही आराम मिळतो. त्यातील मेन्थॉल गुणधर्म आपल्याला सर्दीमध्ये सहज श्वास घेण्यास मदत करतो.

ऊर्जा वाढवते -
जेव्हा तुम्हाला जास्त वेळ काम करावे लागते आणि तुम्हाला थकवा जाणवत असेल तेव्हा पेपरमिंटचा वास घ्या. त्यामुळे तुमची उर्जा वाढते. मात्र, पेपरमिंटचा वास घेतल्याने शरीरात आंतरिक कोणते बदल होतात याबाबत शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत.

बॅक्टेरिया मरतात -
शास्त्रज्ञांनी E.coli, Listeria आणि Salmonella सारख्या अनेक जीवाणूंवर पेपरमिंट तेलाची चाचणी केली. चाचणी दरम्यान, असे आढळून आले की पेपरमिंटने या तीनही जीवाणूंची वाढ रोखली. या सोबतच पेपरमिंट स्टेफिलोकोकस ऑरियसला देखील मारू शकते. स्टॅफिलोकोकस ऑरियसमुळे त्वचेचा संसर्ग होतो.

वजन कमी करण्यास देखील मदत होते -
शास्त्रज्ञ पेपरमिंटवर सतत संशोधन करत असतात. काही अभ्यासात असे आढळून आले आहे की, त्याचा वापर तुमची भूक मंदावतो. लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुम्ही पेपरमिंट वापरू शकता, यामुळे तुम्हाला भूक कमी लागेल आणि वजन कमी करण्यात मदत होईल.

Web Title: pudina or mint benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.