या काही सवयींमुळे शरीरात वाढतं Uric Acid, किडनीमध्ये जमा होतात विषारी पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 03:51 PM2023-12-07T15:51:56+5:302023-12-07T15:52:24+5:30
हे प्यूरिन वाढल्याने वाढतात आणि अनेक समस्यांचं कारण बनतात. तसं तर शरीर स्वत:च एक्सट्रा यूरिक अॅसिड बाहेर काढतं, पण जेव्हा असं होत नाही तेव्हा समस्या सुरू होतात.
यूरिक अॅसिड शरीरातील एक अपशिष्ट पदार्थ आहे. जे वाढल्याने शरीरात छोटे-छोटे क्रिस्टल तयार होतात. हे प्यूरिन वाढल्याने वाढतात आणि अनेक समस्यांचं कारण बनतात. तसं तर शरीर स्वत:च एक्सट्रा यूरिक अॅसिड बाहेर काढतं, पण जेव्हा असं होत नाही तेव्हा समस्या सुरू होतात.
हाय यूरिक अॅसिडची लक्षणं
रक्तात यूरिक अॅसिड वाढलं तर गाउट आणि किडनी स्टोन होतो. मग त्यामुळे जॉइंटमध्ये वेदना, सूज, मळमळ, उलटी, पुन्हा पुन्हा लघवी येणे, लघवीतून रक्त येणे, कंबरेच्या खाली वेदना, उठण्या-बसण्यात समस्या अशी लक्षण दिसतात.
यूरिक अॅसिड वाढवणाऱ्या सवयी
प्यूरिन फूड्स जास्त खाणं
जास्त अल्कोहोलचं सेवन
हाय फॅट असलेले फूड खाणं
गोड पदार्थ जास्त खाणं
मिठाचं जास्त सेवन करणं
प्यूरिन फूडपासून रहा दूर
हे तत्व सगळ्यात जास्त मांसाहारी खाद्य पदार्थांमध्ये असतं. मायोक्लीनिकनुसार, प्यूरिन असलेली डाएट घेतल्याने रक्तात जास्तीत जास्त विषारी पदार्थ भरू लागतात. यामुळे तुम्ही लाल मांस, सीफूड, प्राण्यांचं लिव्हर, किडनीसारखे अवयव खाऊ नये.
अल्कोहोलही जीवघेणं
खाण्याशिवाय अल्कोहोलमध्ये प्यूरिन असतं. बीअर, व्हिस्की किंवा वाईनमुळेही यूरिक अॅसिड वाढतं. किडनी स्टोन किंवा सांधीवात असल्यावर तर हे ड्रिंक्स अजिबात घेऊ नये. अशात स्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
हाय फॅट फूड
तळलेले-भाजलेले पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. तसेच यांमुळे किडनी स्टोनची समस्याही होऊ शकते. कारण लठ्ठपणा आणि हाय यूरिक अॅसिड यांचा खोलवर संबंध आहे. त्यामुळे तुम्हाला वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी बॅलन्स्ड डाएट आणि नियमित एक्सरसाइज करावी लागेल.
मिठाचं सेवन कमी
मिठाचं जास्त सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरची समस्या होते. याने हृदय, मेंदू आणि किडनीचं कामकाज बंद होऊ शकतं. ज्यामुळे विषारी पदार्थ रक्तातून फिल्टर होत नाही आणि आतल्या आत जमा होऊ लागतात.