झोपताना उशीखाली लसूण ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 11:10 AM2024-06-06T11:10:53+5:302024-06-06T11:11:45+5:30

Garlic in Pillow benefits : काही जुने लोक झोपताना उशीखाली लसणाची एक कळी ठेवतात. याचं कारण तुम्हालाही माहीत नसेल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

put garlic under your pillow while sleeping see the magic | झोपताना उशीखाली लसूण ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या यामागचं कारण...

झोपताना उशीखाली लसूण ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या यामागचं कारण...

Garlic in Pillow benefits : आयुर्वेदात लसणाला फार महत्व आहे. कारण लसणाचे आरोग्याला अनेक फायदे होतात आणि वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. खासकरून हृदयरोग दूर ठेवण्यासाठी लसूण रामबाण उपाय मानला जातो. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये लसणाचा वापर केला जातो. तर काही लोक कच्चा लसूणही खातात. अनेक एक्सपर्ट सांगतात रोज लसणाची एक कच्ची कळी खावी. तसेच जेवण करताना कच्चा लसूण खावा. पण अनेकांना हे माहीत नाही की, काही जुने लोक झोपताना उशीखाली लसणाची एक कळी ठेवतात. याचं कारण तुम्हालाही माहीत नसेल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल की, पूर्वी घराच्या एखाद्या कोपऱ्यात लसूण ठेवत होते. यामुळे घरातील हवेमध्ये असलेले बॅक्टेरिया, विषाणू नाहीसे व्हायचे. त्याचसोबत लसूण नकारात्मक उर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतो. यामुळे अनेक लोक लसणाची कळी (Garlic Cloves Benefits) आपल्या उशाखाली घेऊन झोपतात. उशीखाली लसणाची पाकळी उशीखाली ठेऊन झोपल्याने शांत झोप लागते.

आजकाल धावपळीच्या जीवनामुळे, कामाच्या वाढत्या ताणामुळे, वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमुळे सतत तणाव असतो. डोक्याला शांतता मिळत नाही. डोकं शांत नसेल तर तुम्हाला चांगली झोपही लागत नाही. तुम्हाला जर चांगली झोप हवी असेल तर उशीखाली रोज एक लसणाची कळी ठेवून बघा. लसणाचे काय काय फायदे होतात हे खालील प्रमाणे सांगता येतील.

कोलेस्ट्रॉल कमी होतं

कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कॅन्सरचा धोका टाळण्याचे गुणही लसणात आहेत. 

नकारात्मक ऊर्जा दूर होते

लसूण नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देतं. त्यामुळे आजही अनेक लोक लसणाची एककळी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.

कफ दूर होतो

लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. तसेच पोटाच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात. शरीरातील अनेक विषारी पदार्थ यामुळे बाहेर पडतात.

गॅस होत नाही

पोटात गॅस तयार होण्याची समस्या लसूण दूर करतो. लसूण हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो.

लसणातील पोषक तत्वे

लसणात असलेले ‘क’ जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास उपयोग होतो. लसणात अ‍ॅलिसिन नावाचे औषधी तत्त्व असतं. त्यामुळ फंगस, बॅक्टेरिया दूर होण्यास मदत मिळते.
 

Web Title: put garlic under your pillow while sleeping see the magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.