जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं? करा 'हा' नॅचरल उपाय, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 01:18 PM2024-10-25T13:18:06+5:302024-10-25T13:57:33+5:30

Oil In Navel : आज आम्ही चार अशा तेलांबाबत सांगणार आहोत, जे तुम्ही नाभिवर रोज लावले तर तुमचं पचन तंत्र मजबूत होतं. याने पचनासंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते.

Put Oil and ghee in navel for better digestion and constipation | जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं? करा 'हा' नॅचरल उपाय, मग बघा कमाल!

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं? करा 'हा' नॅचरल उपाय, मग बघा कमाल!

Oil In Navel : आजकाल चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. ज्यात अपचन, गॅस आणि ब्लोटिंग म्हणजे पोट फुगणे अशा समस्या होतात. अशात औषधांचा वापर करण्याऐवजी तुम्ही नॅचरल उपाय करून या समस्या दूर करू शकता. आज आम्ही चार अशा तेलांबाबत सांगणार आहोत, जे तुम्ही नाभिवर रोज लावले तर तुमचं पचन तंत्र मजबूत होतं. याने पचनासंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते.

खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याचं तेल नाभिवर टाकणं खूप फायदेशीर मानलं जातं. याने पचन तंत्र थंड राहतं. यात आवश्यक फॅटी अॅसिड असतं जे पोटासाठी फायदेशीर असतं.

मोहरीचं तेल

मोहरीचं तेलही पोटासंबंधी समस्यांसाठी खूप फायदेशीर असतं. याचा तुम्ही जेवण बनवण्यासाठीही वापर करू शकता. तसेच दोन थेंब तेल रोज नाभिवर टाकल्याने पचन क्रियाही योग्यपणे होते.

ऑलिव्ह ऑईल

नाभिवर रोज रात्री झोपण्याआधी एक थेंब ऑलिव्ह ऑइल टाका. याने पोटात गॅस तयार होणे आणि बद्धकोष्ठता अशा समस्या दूर होतात.

तूप

शुद्ध तूप नाभिवर लावल्याने पचन तंत्र मजबूत राहतं आणि गॅसची समस्याही दूर होते.

नाभिवर तेल टाकण्याचे फायदे

नाभिवर तेल किंवा तूप लावल्याने पचन तंत्र मजबूत राहतं. त्याशिवाय नाभिमध्ये तेल लावल्याने पोटाच्या मसल्सना आराम मिळतो. पोटातील जळजळ आणि वेदनाही कमी होतात. इतकंच नाही तर जर रोज नाभिवर तेल किंवा तूप लावाल तर पोटातील सूज कमी केली जाऊ शकते. रोज रात्री झोपण्याआधी नाभिवर तेल लावू शकता. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.

Web Title: Put Oil and ghee in navel for better digestion and constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.