प्राण्यांच्या चाव्यामुळे होतो हा जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 10:58 AM2018-09-28T10:58:43+5:302018-09-28T10:59:11+5:30
वर्ल्ड रेबीज डे म्हणजेच विश्व रेबीज दिवस २८ सप्टेंबरला साजरा केला जातो. जनावरांच्या चावल्याने पसरणारा रेबीज हा एक व्हायरस आहे.
वर्ल्ड रेबीज डे म्हणजेच विश्व रेबीज दिवस २८ सप्टेंबरला साजरा केला जातो. जनावरांच्या चावल्याने पसरणारा रेबीज हा एक व्हायरस आहे. हा एक जीवघेणा आजार असून याची लक्षणे लगेच दिसत नाहीत. याच कारणाने एखाद्या व्यक्तीमध्ये जर रेबीजचा व्हायरस असेल आणि वेळीच लक्षणे दिसली नाही तर उपचाराची वेळ निघून जाते. रेबीज फारच गंभीर आजार आहे. पण लोकांमध्ये याबाबत असलेली कमी माहिती अधिक घातक ठरु शकते.
बहुदा लोक असं मानतात की, रेबीज केवळ कुत्र्यांनी चावल्याने होतो, पण हे सत्य नाहीये. कुत्रा, मांजर, माकड या आणि इतरही काही प्राण्यांच्या चावल्याने रेबीजचा व्हायरस व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करु शकतो. त्यासोबतच अनेक पाळीव प्राण्यांच्या चाटण्याने किंवा रक्तांचा प्राण्याच्या लाळेसोबत थेट संपर्क झाल्यानेही हा आजार होतो. चला जाणून घेऊया या आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपचार...
कसा होतो रेबीज?
रेबीज एकप्रकारचं व्हायरल इन्फेक्शन आहे. प्राण्यांच्या चावल्याने याचा संसर्ग होतो. हा व्हायरस फारच घाटक आहे. जर वेळेवर उपचार केले गेले नाही तर हा आजार जीवघेणा ठरु शकतो. रेबीज व्हायरस कोणत्याही व्यक्तीच्या शरीराला दोन प्रकारे प्रभावित करतो.
जेव्हा रेबीजचा व्हायरस थेट व्यक्तीच्या नर्वस सिस्टीममध्ये पोहोचतो आणि त्यानंतर तो व्यक्तींच्या डोक्यात शिरतो. जेव्हा हा व्हायरस व्यक्तीच्या मासंपेशींमध्ये शिरतो तेव्हा व्यक्तीच्या इम्यून सिस्टीममुळे ते जिवंत राहतात आणि वाढतात.
रेबीज व्हायरस जेव्हा व्यक्तीच्या नर्वस सिस्टीममध्ये पोहोचतात तेव्हा मेंदुमध्ये सूज निर्माण होते. याने व्यक्ती लगेच कोमामध्ये जातो किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो. या रोगामुळे व्यक्तीच्या व्यवहारात अनेकदा बदल होतो आणि कोणतही कारण नसताना ते हायपर होतात. तसेच त्यांनी पाण्याची भीतीही वाटते. तसेच काही लोकांमध्ये पॅरालिसीसची समस्याही बघायला मिळते.
कसा परसतो रेबीज?
रेबीज हा लाळेतून पसरणारा रोग आहे. प्राण्यांच्या लाळेचा संबंध जेव्हा व्यक्तीच्या रक्ताशी येतो तेव्हा हा व्हायरस परसतो. व्यक्तीच्या रक्तात हा व्हायरस एकतर प्राणी चावल्याने पोहोचतो किंवा पाळीव प्राण्याने जखम चाटल्यानेही पसरतो. जर व्यक्तीची त्वचा कुठेही कापलेली किंवा फाटलेली नसेल तर हा व्हायरस परसण्याचा धोका कमी असतो.
काय आहेत रेबीजची लक्षणे?
रेबीजने ग्रस्त लोकांमध्ये रेबीजची लक्षणे फार उशिरा दिसतात. तोपर्यंत उपचार कठीण होतात. रेबीजची काही लक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.
ताप येणे
डोकेदुखी
घाबरल्यासारखं होणे किंवा अस्वस्थता
चिंता आणि व्याकुळता
भ्रम होणे
पदार्थ गिळण्यास समस्या
फार जास्त लाळ निघणे
पाण्याची भीती वाटणे
वेडेपणाची लक्षणे
झोप न येणे
एका भागाला पॅरालिसीस किंवा लकवा मारणे
काय करावे उपाय?
प्राण्याने चावले असेल तर चावलेली जागा लगेच पाणी आणि साबणाने स्वच्छ करा. त्या जागेवर चांगल्याप्रकारे टिंचर किंवा पोवोडीन आयोडिन लावा. असे केल्याने कुत्रा किंवा इतर प्राण्यांच्या लाळेमध्ये आढळणारे किटाणू सिरोटायपवन लायसावायरसच्या ग्लालकोप्रोटीनचा अंश त्यात मिसळतो. याने या रोगाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होतो. प्राण्याने चावल्यानंतर त्या व्यक्तीला लगेच टिटेनसचं इन्जेक्शन द्यावं. आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावे.