कुत्रा चावल्यावर लगेच करा ही 3 कामे, उपचार न घेतल्यास असं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 12:31 PM2018-06-07T12:31:17+5:302018-06-07T12:31:17+5:30

तुम्हाला हे माहीत असणं फारच गरजेचं आहे की, कुत्रा चावल्यानंतर काही मिनिटात किंवा काही तासांनी काय करायला हवं. 

Rabies symptoms causes treatment and prevention first aid after dog bite | कुत्रा चावल्यावर लगेच करा ही 3 कामे, उपचार न घेतल्यास असं पडू शकतं महागात!

कुत्रा चावल्यावर लगेच करा ही 3 कामे, उपचार न घेतल्यास असं पडू शकतं महागात!

googlenewsNext

कुत्रा चावल्यास अजिबात निष्काळजीपणा करुन चालत नाही अथवा तुम्हाला रेबीज होण्याची शक्यता असते. रेबीजला हायड्रोफोबियाही म्हटलं जातं. हे प्राण्यांच्या चावल्याने होणारं व्हायरल जेनेटिक इन्फेक्शन आहे. अनेकांना हे माहीत नसतं की, कुत्रा चावल्यानंतर नेमकं काय करायला हवं. आणि लोक घाबरुन चुकीचे काहीतरी उपाय करतात. तुम्हाला हे माहीत असणं फारच गरजेचं आहे की, कुत्रा चावल्यानंतर काही मिनिटात किंवा काही तासांनी काय करायला हवं. 

लगेच करा ही 3 कामे

एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार खालील तीन गोष्टी सर्वातआधी केल्या गेल्या पाहिजे.

1) चावल्याने झालेल्या जखमेवर कपडा बांधू नका. ती जखम मोकळी ठेवा.

2) जखम झालेला भाग पाण्याने धुवून घ्या.

3) 24 तासांत डॉक्टरांना ही जखम दाखवायला हवी आणि इन्फेक्शनपासून बचावासाठी इंजेक्शन घेतलं पाहिजे.

सर्वात महत्वाची बाब

शक्य असल्यास हे माहिती घेण्याचा प्रयत्न करा की, तुम्हाला चावलेल्या कुत्र्याला रेबीज तर नव्हता ना. कारण रेबीज असलेल्या कुत्र्याने तुम्हाला चावा घेतल्यास तुम्हालाही रेबीज होऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, रेबीजवर कोणताही उपचार नाहीये. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर काही दिवस त्या कुत्र्यावर नजर ठेवा. जर काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला तर तुम्हालाही मोठा धोका होऊ शकतो. 

कुत्र्याला रेबीज असल्याची लक्षणे

1) जेव्हा कुत्रा त्याची छेडखानी न करता तुमच्या अंगावर येत असेल किंवा त्याला चावण्याची सवय असेल.

2) तो कुत्रा लाकूड, गवत किंवा इतरही वस्तूंना चावत असेल तर...

3) अधिक हिंसक होणे, घरातून पळून जाणे, रस्त्यात जो दिसेल त्याला चावणे

4) रेबीज असलेला कुत्रा हा फाटक्या आवाजात भुंकतो. 

काय आहे रेबीज?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, रेबीज लायसो व्हायरस म्हणजे विषाणूपासून होतो. हा आजार केवळ कुत्र्यांच्या चावण्यानेच नाहीतर इतर मांजर, माकड, कोल्हा, डुक्कर यांच्या चावण्यानेही होतो. हा आजार जर एखाद्या मनुष्याला झाला तर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. हा आजार झाल्यावर 5 ते 6 दिवसात मृत्यू होतो. त्यामुळेच याचं संक्रमण अधिक वाढू नये म्हणून लगेच यावर उपाय केले जावे. 

रेबीज झाल्याची लक्षणे

1) कुत्रा चावल्यानंतर चिडचिडेपणा वाढतो.

2) ताप येणे

3) तोंडातून लाळ बाहेर येणे

4) मासंपेशींमध्ये तणाव वाढणे

कुत्रा चावल्यावर काय करावे उपाय?

तुम्हाला रेबीज असलेल्या कुत्र्याने चावले असेल तर डॉक्टर तुमच्या उपचारासाठी खालील लसी घेण्याचा सल्ला देऊ शकतात. 

1) सामान्य खरचटले असेल तर लस घेणं सर्वात प्रभावी ठरतं. जर फार जास्त जखम झाली असेल तर अॅंटी-रेबीज इम्युनोग्लोबुलिन आवश्यक आहे. 

2) जास्तीत जास्त प्रकरणात डॉक्टर टाके लावण्यास नकार देतात. कारण याने इतर अंगाना संक्रमण वाढू शकतं. 

3) जर पाळीव कुत्र्याने चावले असेल तर तीन लसी घ्याव्या लागतात. एक कुत्र्याने चावल्याच्या एका दिवसानंतर, दुसरा तीन दिवसांनंतर आणि तिसरा सात दिवसांनंतर.

4) जर तुम्हाला मोकाट कुत्र्याने चावले असेल तर तिसऱ्या लसीनंतर एका आठवड्यात तुम्हाला पाच ते सात लसी घ्यावा लागू शकतात. 

Web Title: Rabies symptoms causes treatment and prevention first aid after dog bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.