Radish Benefits : हिवाळ्यात मूळा खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 10:00 AM2022-11-26T10:00:19+5:302022-11-26T10:02:06+5:30
Radish health benefits : हिवाळ्यात अनेक समस्याही होतात. ज्यांबाबत काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात मूळा खूपजण खातात. या दिवसात मूळा खाण्याचे अनेक फायदेही होतात. चला जाणून घेऊ काय होतात हे फायदे...
Radish health benefits : अनेक लोक हिवाळ्याची वाट बघत असतात. कारण उन्हाळा आणि पावसाळा सगळ्यांनाच आवडतो असं नाही. शिवाय हिवाळ्यात खाण्याचीही चांगली मौज असते. पण हिवाळ्यात अनेक समस्याही होतात. ज्यांबाबत काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात मूळा खूपजण खातात. या दिवसात मूळा खाण्याचे अनेक फायदेही होतात. चला जाणून घेऊ काय होतात हे फायदे...
काय असतात पोषक तत्व
मूळा थेट किंवा सॅलडच्या रूपात खाल्ला जातो. काही लोक याची भाजीही करून खातात. यात अनेक पोषक तत्व असतात. जर तुम्हीही मूळा खाल तर तुम्हाला व्हिटॅमिन ए, आयरन, कॅल्शिअम आणि फॉस्फोरस मिळतं. जे आरोग्यासाठी चांगलं असतं.
इम्यूनिटी वाढेल
जेव्हाही हिवाळा येतो तेव्हा इन्फेक्शनचा धोका सगळ्यात जास्त राहतो. जर आपली इम्यूनिटी मजबूत राहिली तर अनेक आजार आपल्यापासून दूर राहतील. त्यामुळे रोज मूळा खा आणि तुमची इम्यूनिटी बूस्ट करा.
सर्दी-खोकल्यापासून बचाव
हिवाळ्यात सर्दी, खोकला होण्याचा धोका नेहमीच राहतो. यापासून वाचवण्यासाठी या दिवसात तुम्ही नियमितपणे मूळा खा. जेणेकरून या समस्यांपासून तुमचा बचाव होईल.
डायबिटीसमध्येही फायदेशीर
ज्या लोकांना डायबिटीस आजार आहे. त्यांनी मूळ्याचं सेवन करणं औषधासारखंच ठरतं. मूळा खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करणं सोपं होतं. पण या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मूळा खाऊ नये.
हृदयासाठी फायदेशीर
हिवाळ्यात मिळणारा मूळा आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. याने हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिजीजचा धोका फार कमी राहतो.