लिवर आणि पोटासाठी 'प्युरिफायर'चं काम करतो मुळा; जाणून घ्या फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 10:49 AM2018-10-06T10:49:04+5:302018-10-06T10:49:10+5:30

मुळा हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कंदमूळ आहे. तज्ज्ञांच्या मते, मुळ्याचे सेवन केल्यास कोणत्याही आजारापासून बचाव करता येतो.

Radish is natural purifier for stomach and liver | लिवर आणि पोटासाठी 'प्युरिफायर'चं काम करतो मुळा; जाणून घ्या फायदे!

लिवर आणि पोटासाठी 'प्युरिफायर'चं काम करतो मुळा; जाणून घ्या फायदे!

Next

मुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पांढरा मुळा सर्व ऋतूमध्ये मिळतो परंतु हिवाळ्यात मिळणारा मुळा चांगल्या दर्जाचा आणि शरीरासाठी उपयुक्त असतो. मुळा हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कंदमूळ आहे. तज्ज्ञांच्या मते, मुळ्याचे सेवन केल्यास कोणत्याही आजारापासून बचाव करता येतो.

कच्चा कोवळा मुळा हा मलमूत्राच्या विकारांवर, तर थोडा जून झालेला पण कच्चा मुळा सलाड म्हणून खाल्ला तर मूळव्याध, पोटातले गॅसेस धरणे, अपचन या पोटाच्या तक्रारी दूर होतात. हृदयाशी संबधीत आजारामध्ये किंवा कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी मुळ्याचे सेवन लाभदायक आहे. ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांनी सॅलड स्वरूपात नियमित मुळा खावा. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.

- पिवळे दात पांढरेशुभ्र करण्यासाठी मुळ्याच्या तुकड्यावर लिंबू पिळून तो तुकडा थोडा वेळ चावून थुंकून टाका. या उपायाने दात चमकदार होतील.

- ज्या लोकांची पचनक्रिया व्यवस्थित नाही आणि पोट साफ होत नसेल, तर त्यांनी मुळ्याचे सेवन कच्च्या स्वरूपात करावे. मूळव्याध कमी करण्यातही मुळा फायदेशीर आहे.

- त्वचेसाठीही वरदान आहे. मुळ्यात असलेल्या ‘क’ जीवनसत्त्व, स्फूरद (फॉस्फरस), जस्त (झिंक) व बी-कॉम्प्लेक्समुळे त्वचाविकार दूर होतात. यामध्ये भरपूर पाणी असल्याने त्वचेचा ओलावा कायम राहतो. तसेच त्वचा कोरडी किंवा निर्जीव होत नाही.

- मुळा वजन कमी करण्यात साहाय्यक आहे. आहारात मुळ्याचा समावेश केल्याने लवकर पोट भरते. अतिखाण्यापासूनही बचाव होतो. मुळ्यात जास्त कॅलरीही नसतात.

नियमित मुळा खाल्ल्यास लवकर फायदा

घरात सलाद म्हणून जेवताना खाल्ला जाणारा मुळा तुमच्या आरोग्यासाठी निश्चितच चांगला असतो. मुळा हा पाईल्स म्हणजेच मूळव्याधवर उपाय तर आहेच, पण मूळव्याधी होणं थांबवण्याचं कामही मुळा करतो. मूळव्याधचं स्वरूप वाढल्यास भंगदर, बवासीर सारखे भयंकर प्रकार समोर येतात. हे थांबवण्यासाठी मुळा खाण्याशिवाय साधा सोपा उपाय कोणताही नाही.

मुळा गुणकारी का?

मूळव्याधच्या रोग्यांना नेहमी मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण याच्यात लवकर मिळणारे फायबर्स असतात, फायबर्स मल मुलायम करतात, आणि पचनक्रिया तंदुरूस्त ठेवण्यात मदत करतात. यात वाष्पशील तेलही असतं, जे पाईल्स असताना होणारा दाह कमी करण्यास मदत करतं आणि सूज कमी होते. तसेच मुळा थंडावा देण्याचं काम करतो आणि दाह कमी होतो.

Web Title: Radish is natural purifier for stomach and liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.