राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यासाठी नवसंजीवनी १९ रुग्णालयांमध्ये सुविधा : ३६ हजार रुग्णांनी घेतला लाभ, ८३ कोटी रुपये खर्च

By Admin | Published: April 28, 2016 12:32 AM2016-04-28T00:32:05+5:302016-04-28T00:32:05+5:30

जळगाव : राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यांसाठी नवसंजीवनी ठरत असून अनेक गंभीर आजारातून या योजनेमुळे रुग्णांची सुटका झाली आहे. योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ६९० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यावर शासनाकडून ८३ कोटी ८२ लाख ९१ हजार ३१६ रुपये खर्च झाला आहे.

Rajiv Gandhi Swasthya Jeevandayee Yojana Navsanjivan for common facilities: Facilities in hospitals: 36 thousand patients benefit, 83 crores spent | राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यासाठी नवसंजीवनी १९ रुग्णालयांमध्ये सुविधा : ३६ हजार रुग्णांनी घेतला लाभ, ८३ कोटी रुपये खर्च

राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यासाठी नवसंजीवनी १९ रुग्णालयांमध्ये सुविधा : ३६ हजार रुग्णांनी घेतला लाभ, ८३ कोटी रुपये खर्च

googlenewsNext
गाव : राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यांसाठी नवसंजीवनी ठरत असून अनेक गंभीर आजारातून या योजनेमुळे रुग्णांची सुटका झाली आहे. योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ६९० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यावर शासनाकडून ८३ कोटी ८२ लाख ९१ हजार ३१६ रुपये खर्च झाला आहे.
राज्यातील शेवटच्या घटकांपर्यंत मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहचविण्याच्या हेतूने २१ नोव्हेंबर २०१३ रोजी शासनाने सुरू केलेल्या या योजनेची प्रारंभी सामान्यांना पुरेशी माहिती नव्हती. मात्र नंतरच्या काळात सोशल मीडिया, फलक, माध्यमातील जाहिराती यामुळे ही योजना घराघरात पोहचली.

१९ रुग्णालयांमध्ये योजना सुरू...
ही योजना जिल्‘ात १९ रुग्णालयांमध्ये सुरू आहे. यामध्ये जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयासह १३ रुग्णालयांमध्ये तर भुसावळ येथे चार, जामनेर व चोपडा येथे प्रत्येकी एक रुग्णालयामध्ये ही सुरू आहे. या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यात जळगाव, भुसावळ, चोपडा, जामनेर या तालुक्यांमध्ये योजनेचा लाभ घेण्यार्‍यांची संख्या मोठी आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या महाआरोग्य शिबिरातील योजनेंतर्गत १००० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

लाभार्थी कोण....
या योजनेंतर्गत ९७१ गंभीर शस्त्रक्रिया व उपचार पद्धतीवर मोफत सेवा दिली जाते. लाभ घेण्यासाठी रुग्ण हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा व तो पिवळे, अंत्योदय व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक असावा.

चांगल्या सेवेची हमी....
जे नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना अंगीकृत रुग्णालयांमध्ये योग्य सेवा मिळाली की नाही याबाबत मुंबई कार्यालयातून थेट रुग्णांशी संपर्क साधून खात्री केली जाते. उपचारात उणीव असल्यास अथवा अन्य तक्रारी असल्यास संबंधित रुग्णालयाचा निधी रोखला जातो. त्यामुळे रुग्णालयांना चांगली सेवा देणे क्रमप्राप्त ठरल्याने या योजनेत चांगल्या सेवेची हमी असते.

गंभीर आजारांवर उपचार....
ह्रदयरोग, कर्करोग, मूत्रपिंड विकार, मेंदूचे विकार यासारख्या गंभीर आजारांवर शस्त्रक्रियेचा खर्च आवाक्याबाहेर असलेल्या रुग्णांना ही लाभदायी ठरली आहे. तपासणी, परीक्षण, वैद्यकीय उपचार, औषधे, शस्त्रक्रिया, रुग्णांचे जेवण तसेच दवाखान्यातून सु˜ी (डिस्चार्ज) देताना एकेरी प्रवास खर्च व उपचाराचा पाठपुरावा या बाबी योजनेच्या लाभात समाविष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे या योजनेबाबत नागरिक अधिक सकारात्मक असल्याचे चित्र जिल्‘ात आहे.

Web Title: Rajiv Gandhi Swasthya Jeevandayee Yojana Navsanjivan for common facilities: Facilities in hospitals: 36 thousand patients benefit, 83 crores spent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.