Raju Srivastav Death: राजू श्रीवास्तव यांचा कार्डियाक अरेस्टने गेला जीव, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 12:14 PM2022-09-21T12:14:41+5:302022-09-21T12:15:00+5:30

Raju Srivastav Death Reason : गेल्या महिन्यात राजू श्रीवास्तव यांची अचानक तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 41 दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्येच होते.

Raju Srivastav Death Reason : he dies At the age of 58 cardiac arrest symptoms warning sign cause | Raju Srivastav Death: राजू श्रीवास्तव यांचा कार्डियाक अरेस्टने गेला जीव, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

Raju Srivastav Death: राजू श्रीवास्तव यांचा कार्डियाक अरेस्टने गेला जीव, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

googlenewsNext

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav Death) यांचं आज 58 वयात निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. ते बरे होण्याची अपेक्षा होती, पण आज सकाळी अचानक त्यांचं निधन झालं. गेल्या महिन्यात राजू श्रीवास्तव यांची अचानक तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 41 दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्येच होते.

राजू श्रीवास्तव हे हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर एक्सरसाइज करताना त्यांच्या छातीत दुखलं आणि ते खाली पडले. यानंतर राजू यांना जिम ट्रेनरने लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितलं की, एक्सरसाइज करताना राजू श्रीवास्तव यांना कार्डियाक अरेस्ट (cardiac arrest symptoms) आला होता. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायक केके यांचंही कार्डियाक अरेस्टमुळेच निधन झालं होतं. 

अलिकडे कमी वयातच लोकांना कार्डियाक अरेस्ट येण्याचा धोका वाढला आहे. कार्डियाक अरेस्टच्या लक्षणांना लोक सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. जे घातक ठरू शकतं. कार्डियाक अरेस्ट काय आहे? कार्डियाक अरेस्टची लक्षणे काय आहेत? 

काय असतो कार्डियाक अरेस्ट?

अनेक लोकांना वाटतं की, कार्डियाक अरेस्ट हार्ट अटॅकचं एक रूप आहे. पण असं अजिबात नाहीये. कार्डियाक अरेस्ट हा हृदयातील आतील भागात काही बिघाड झाल्याने येतो. म्हणजे हृदयाचं काम आहे रक्त शुद्ध करणं आणि शरीरात सगळीकडे रक्त पुरवठा करणं. जर यात काही बिघाड झाला तर समस्या होते. याचा थेट प्रभाव हृदयाच्या गतीवर पडतो. ज्या लोकांना आधीच हार्ट अटॅक येऊन गेला आहे त्यांना कार्डियाक अरेस्ट येण्याची जास्त शक्यता आहे.

कार्डियाक अरेस्टची लक्षणे

हृदयाची धडधड वेगाने होते

छातीत वेदना होणे

चक्कर येणे

श्वास घेण्यास समस्या होणे

लवकर थकवा जाणवणे

अचानक कसा येतो कार्डियाक अरेस्ट?

कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक काम करणं बंद करतं. श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो आणि बेशुद्ध झाल्यासारखं वाटू लागतं. हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये गडबड होऊ लागते. ज्यामुळे ही स्थिती बनते. यामुळे हृदयाची पंपिंग क्रिया विस्कळीत होते आणि शरीरातील ब्लड फ्लो थांबतो.

हार्ट अटॅक काय असतो?

आजकालच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे हार्ट अटॅकमुळे मृत्यूदर वेगाने वाढत आहे. ज्यामुळे अनेक लोक आपली लाइफस्टाईल चांगली करण्याच्या मागे लागले आहेत. पण जेव्हा कार्डियाक अरेस्टचा विषय येतो तेव्हा हार्ट अटॅकची शंका चिंता वाढवते. हार्ट अटॅक तेव्हा होतो जेव्हा हृदयाच्या काही भागांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो. पण कार्डियाक अरेस्टमध्ये रक्तप्रवाह अचानक बंद होतो. हार्ट अटॅक नंतरही शरीरातील काही भागांमध्ये रक्तप्रवाह सुरू असतो. पण कार्डियाक अरेस्टच्या स्थितीत रक्तप्रवाह शरीरात पूर्णपणे बंद होतो.

Web Title: Raju Srivastav Death Reason : he dies At the age of 58 cardiac arrest symptoms warning sign cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.