हाताच्या बोटांना नखेच नाहीत ? असा कोणता दुर्मिळ आजार बघा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 05:09 PM2022-11-09T17:09:12+5:302022-11-09T17:10:08+5:30
तुम्हाला जर हाता पायांच्या बोटांना नखेच नसली तर ? हे शक्य आहे का तर हो, एक आजार असा आहे ज्यामध्ये जन्मापासूनच हात आणि पायाच्या बोटांना नखेच येत नाही.
तुम्हाला जर हाता पायांच्या बोटांना नखेच नसली तर ? हे शक्य आहे का तर हो, एक आजार असा आहे ज्यामध्ये जन्मापासूनच हात आणि पायाच्या बोटांना नखेच येत नाही. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये हाताच्या बोटांना नखंच नाहीएत. या आजाराला अॅनोनिशिया Anonychia म्हणले जाते.
Anonychia हा एक दुर्मिळ आजार आहे जो जन्मत:च होतो. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इंफॉर्मेशन नुसार, Anonychia हा खूप कमी व्यक्तींमध्ये आढळणारा आजार आहे. अशाही काही केसेस आहेत ज्यामध्ये काही प्रमाणात नखे आहेत तर काही केसेस मध्ये अजिबातच नखे दिसून .येत नाहीत.
हा असा आजार आहे ज्यावर अजून एकही ट्रिटमेंट अस्तित्वात नाही. कृत्रीम नखे हाच त्यावर सध्या उपाय आहे. मात्र सध्या व्हायरल होत असलेला फोटो पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.