महिलांना 'या' आजारांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 10:29 AM2019-06-01T10:29:47+5:302019-06-01T10:36:51+5:30
वुमन हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, जास्तीत जास्त महिला सर्वायकल कॅन्सरची टेस्ट करत नाहीत.
(Image credit : Medical News Today)
२०१८ मधील एका रिपोर्टनुसार, भारतात दरवर्षी ७५ हजार महिलांचा मृत्यू सर्वायकल कॅन्सरमुळे होतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांच्या योनीमार्गात अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या तोंडावर "ह्युमन पपिल्लोमा व्हायरस'(एचपीव्ही) या विषाणू द्वारे होणारा कर्करोग आहे. तेच एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, दरवर्षी सर्वाइकल कॅन्सरची तपासणी करण्याबाबत महिलांची आकडेवारी दरवर्षी घटत जात आहे. म्हणजे महिला नियमितपणे सर्वायकल कॅन्सरची स्क्रीनिंग करत नाहीत.
(Image Credit : myUpchar)
वुमन हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, जास्तीत जास्त महिला सर्वायकल कॅन्सरची टेस्ट करत नाहीत. पण सर्वायकल कॅन्सरकडे दुर्लक्ष केलं तर याचे परिणाम फार वाईट होऊ शकतात. त्यामुळे वेळेवर याची टेस्ट करणे आणि त्यावर उपचार घेणे गरजेचे आहे.
सर्वायकल कॅन्सरची लक्षणे
यात योनीतून असामान्य रक्तस्त्राव, शारीरिक संबंध ठेवताना रक्तस्त्राव होतो. त्यासोबतच शारीरिक संबंध ठेवताना वेदना होणे, कंबरदुखी, पाय दुखणे, थकवा, वजन कमी होणे, भूक न लागणे हे लक्षणे आढळतात.
(Image Credit : Medical News Today)
सर्वायकल कॅन्सरवर उपचार
इतर कॅन्सरप्रमाणे हा कॅन्सर सुद्धा वेळीच माहीत झाला. आणि योग्य वेळेवर उपचार केले गेले तर तुमचा फायदा होऊ शकतो.
१) महिलांना नियमितपणे आपली टेस्ट करावी.
२) दर तीन वर्षांनी पॅप स्मीअर टेस्ट करावी.
३) त्यासोबतच एचपीवी व्हायरसपासून बचावासाठी योग्य लसी घेणे.
४) धुम्रपान न करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हेल्दी आहार घेणे आणि एक्सरसाइज करणे.