कच्च की उकडलेलं, कोणतं दूध शरीरासाठी जास्त फायदेशीर?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 02:44 PM2024-06-08T14:44:57+5:302024-06-08T15:01:33+5:30
Raw milk drinking benefits : काही लोक कच्च दूध पितात. पण कच्च दूध पिणं बरोबर असतं की चुकीचं? प्रश्नही काही लोकांना पडतो. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
Raw milk drinking benefits : दूध पिणं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. दुधाला एक परिपूर्ण आहार मानलं जातं. दुधातून प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिज आणि फॅटी अॅसिड मिळतं. एक्सपर्ट नेहमीच लहानांसोबतच मोठ्यांनाही दुधाचं सेवन करण्याचा सल्ला देतात. दुधातून शरीराला कॅल्शिअम मिळतं ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. काही लोक कच्च दूध पितात. पण कच्च दूध पिणं बरोबर असतं की चुकीचं? प्रश्नही काही लोकांना पडतो. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
कच्च दूध पिण्याचे फायदे?
दुधामध्ये इम्युनोग्लोबुलिन, लाइसोजाइम आणि लॅक्टोपरोक्सीडेज सारखे तत्व भरपूर असतात. जे नुकसानकारक विषाणुंना नियंत्रित करतात. हे तत्व दूध खराब होण्यापासूनही रोखतात. तसेच दुधामुळे अस्थमा, एक्जिमा आणि एलर्जीचा धोका कमी होतो.
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, कच्च्या दुधात गरम केलेल्या दुधापेक्षा जास्त पोषक तत्व असतात. कच्च दूध उकडलेल्या दुधाच्या तुलनेत लवकर पचतं. तसेच याच्या सेवनाने एलर्जी आणि अॅसिडिटी इत्यादी समस्या दूर होतात.
कच्च्या दुधाचे नुकसान
सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅंड प्रीवेंशननुसार, कच्च्या दुधात लिस्टेरिया, साल्मोनेला इत्यादी नुकसानकारक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे याचं सेवन केल्याने काही आजारांचा धोकाही वाढतो.
उलटी, ताप, पोट खराब, थकवा या समस्या कच्च दूध प्यायल्याने होऊ शकतात. जर कच्च दूध नियमित प्याल तर डिहायड्रेशनची समस्याही होऊ शकते.
आरोग्यासाठी काय फायदेशीर?
एक्सपर्ट सांगतात की, लोकांनी नेहमीच उकडलेलं दूधच सेवन केलं पाहिजे. काही लोकांना वाटतं की, दूध उकडल्यावर त्यातील पोषक तत्व नष्ट होतात आणि दूध हेल्दी राहत नाही. सोबतच दुधाची क्वालिटीही कमी होते. पण असं नाहीये. उकडल्यावर दुधातील बॅक्टेरिया नष्ट होतात. ज्यामुळे आजारी पडण्याचा आणि इन्फेक्शन होण्याचा धोका कमी राहतो.