अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे 'कच्ची पपई'; तुम्हालाही माहीत असायलाच हवेत हे 5 आश्चर्यकारक फायदे! जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 05:07 PM2024-06-27T17:07:47+5:302024-06-27T17:11:10+5:30
...मात्र, गर्भधारणेच्या काळात हिचे सेवन करू नये, असे सांगितले जाते. याशिवाय कच्च्या पपईचे इतरही अनेक फायदे आहेत. तर जाणून घेऊयात काही खास फायदे.
पपई हे फळ चवीबरोबरच आपल्या प्रकृतीसाठीही अत्यंत लाभदायक आहे. साधारणपणे लोक पपई पिकल्यानंतर खातात. पिकलेली पपई पोटासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. मात्र कच्ची पपईदेखील तेवढीच फायद्याची आणि गुणकारी मानली जाते. कच्ची पपई आपली पचनक्रिया चांगली ठेवते. प्रोटीनचे रुपांतर अमीनो अॅसिडमध्ये करते. याशिवाय, कच्ची पपई बद्धकोष्ठता आणि मळमळीपासूनही आराम देते. तसेच, यूरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शनपासून महिलांचे संरक्षण करते. मात्र, गर्भधारणेच्या काळात हिचे सेवन करू नये, असे सांगितले जाते. याशिवाय कच्च्या पपईचे इतरही अनेक फायदे आहेत. तर जाणून घेऊयात काही खास फायदे...
कावीळ -
कावीळ, हा एक गंभीर आजार आहे. या आजारात कच्ची पपई अत्यंत फायदेशीर ठरते. या आजारात दर तीन तासांनी अर्धा ग्लास पपईचे ज्यूस प्यायल्यास कावीळमध्ये आराम मिळतो. पपईमध्ये डायजेस्टिव्ह एंझाइम पॅपेन असते, जे एक प्रोटीओलाइटिक एन्झाइम आहे, यापासून औषधेही तयार केली जातात. याची काविळीवर उपचारातही मदत होते.
आतड्याची हालचाल सुधारते -
कच्ची पपई ही अँटी पॅरासिटिक आणि अँटी अमेबिक असते. यामुळे, पचनासोबतच आतड्यांच्या हालचालीतही सुधार होतो. आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येतही आराम मिळतो. एवढेच नाही तर, कच्ची पपई, अपचन, अॅसिड रिफ्लक्स, अल्सर, छातीत जळजळ होणे आणि गॅस्ट्रिक समस्यांपासूनही आराम देते.
अस्थमा -
पपईची वाळलेली पानं दम्याच्या अटॅकमध्ये अत्यंत उपयुक्त ठरतात. 2022 मधील एका अभ्यासानुसार, पपईमध्ये बीटा कॅरोटीन, लाइकोपीन आणि झेक्सॅन्थिन सारखे ऑरगॅनिक कंपाउंड आढळतात, याच्या सेवनाने दम्याचा अटॅक टाळता येऊ शकतो.
मलेरिया -
कच्च्या पपईमधील व्हिटॅमिन ए आणि सी मलेरियाच्या रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. पपईच्या पानांचे सेवन केल्याने मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांचे कमी झालेले प्लेटलेट काउंट वाढण्यास मदत होते. हे मलेरियावरील एक उत्कृष्ट आयुर्वेदिक औषध आहे.
मेंस्ट्रुअल क्रॅम्प्सपासून आराम देते -
पपईमध्ये असलेले बीटा कॅरोटीन शरीरातील एस्ट्रोजन हार्मोनच्या कार्यत मदत करते. हे पीरियड्सना नियमित करते आणि या काळात होणाऱ्या वेदनाही कमी करते.
(टीप - येथे देण्यात आलेली माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ला नाही. कुठलीही समस्या असेल तर नेहमीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्यायला हवे.)