...म्हणून मुलांचे दूधाचे दात सांभाळून ठेवणं ठरतं फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 04:25 PM2018-12-14T16:25:57+5:302018-12-14T16:27:15+5:30
तुम्हाला आठवतं का, तुमचा जेव्हा दुधाचा दात पडला होता त्यावेळी त्या दाताचे तुम्ही काय केले होते? आपल्यापैकी अनेकजण तो दात घराच्या कौलांवर टाकतात. तर अनेकदा तो दात कापसामध्ये गुंडाळून तुळशीच्या मातीमध्ये पुरतात.
तुम्हाला आठवतं का, तुमचा जेव्हा दुधाचा दात पडला होता त्यावेळी त्या दाताचे तुम्ही काय केले होते? आपल्यापैकी अनेकजण तो दात घराच्या कौलांवर टाकतात. तर अनेकदा तो दात कापसामध्ये गुंडाळून तुळशीच्या मातीमध्ये पुरतात. दुधाचा दात पडल्यावर मुलांना अनेक विचित्र गोष्टीही सांगितल्या जातात. 'आता तुझा दात पडलाय, तू मोठा झालायस नीट वागायचं नाहीतर दुसरा दात येणार नाही.' किंवा 'हा दात परि घेऊन जाते आणि दुसरा दात पाठवून देते.' मुलंही त्यावर विश्वास ठेवून वागू लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का? मुलांचा पडलेला दात टाकून देण्याऐवजी जर सांभाळून ठेवला तर ते त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. नुकतंच झालेल्या एका संशोधनातून यामागील कारण स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुलांचा दुधाचा दात सांभाळून ठेवण्याचा सरळ संबंध तुमच्या मुलांच्या आरोग्याशी निगडीत असतो. वैज्ञानिकांच्या मते, मुलांचा दुधाचा दात डेंटल स्टेम सेल्समध्ये एक्सट्रॅक्ट करण्यासाठी वापरता येतो. ज्यामुळे मुलांच अनेक गंभीर आजारांपासून रक्षण होऊ शकतं.
आपलं शरीर अनेक पेशींपासून तयार झालेलं असतं. यातील स्टेम सेल्स या सर्व पेशींपैकी तरूण पेशी असतात. यांपासून अनेक पेशी तयार होतात. या स्टेम सेल्सना मुलांच्या दूधाच्या दातांनी एक्सट्रॅक्ट केलं जाऊ शकतं. जर मुलांच्या दुधाच्या दातांना व्यवस्थित सांभाळून ठेवलं तर नंतर यापासून अनेक स्टेम सेल्स तयार केल्या जाऊ शकतात. ज्या शरीरातील एखाद्या डॅमेज सेल्सला रिप्लेस करू शकतील.
संशोधक स्टेम सेल्सच्या अनेक फायद्यांवर अजूनही रिसर्च करत आहेत. हे स्टेम सेल्स कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशी लढण्यासाठी मदत करतात. या स्टेम सेल्सना स्टोर करून ठेवणं फार खर्चिक असू शकतं. अनेक पालक आपल्या मुलांच्या दांतांच्या स्टेम सेल्स प्रिजर्व करण्यासाठी फार खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या पाल्याचे अनेक गंभीर आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते.
काही दिवसांपूर्वी झालेल्या रिसर्चमध्ये अडल्ट स्टेम सेल्समध्ये मुलांच्या दातांमधून निघालेल्या स्टेम सेल्सपेक्षा जास्त पोटेन्शिअल असतं. हे आजारांशी लढण्यासाठी सर्वात जास्त मदत करतात. अजुनपर्यंत हे फॅक्ट पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही. स्टेम सेल्स स्टोअर करणं फार खर्चिक आहे. परंतु हे तुमच्यावर निर्भर असतं की, तुम्ही हे करू शकता की नाही.