लोकांमध्ये अंधत्वाचं कारण ठरतोय 'हा' आजार; जाणून घ्या लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 10:56 AM2019-02-02T10:56:47+5:302019-02-02T10:58:05+5:30
सध्या जगभरातील अनेक लोकांमध्ये डोळ्यांच्या अनेक समस्या दिसून येत आहेत. अशातच प्रामुख्याने भेडसावणारी एक समस्या म्हणजे ग्लूकोमा. यामुळे जगभरातील अनेक लोकांना आंधळेपणाच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे.
सध्या जगभरातील अनेक लोकांमध्ये डोळ्यांच्या अनेक समस्या दिसून येत आहेत. अशातच प्रामुख्याने भेडसावणारी एक समस्या म्हणजे ग्लूकोमा. यामुळे जगभरातील अनेक लोकांना आंधळेपणाच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. फक्त भारतामध्येच जवळपास 12 मिलियन लोक ग्लूकोमाने पीडित आहेत. परंतु याबाबत एक चांगली गोष्ट म्हणजे, जर या आजाराबाबत समजले आणि त्यावर योग्य ते उपचार केले तर यापासून सुटका करून घेणं सहज शक्य होतं.
काय आहे ग्लूकोमा?
ग्लूकोमाला साधारण भाषेमध्ये काळा मोती असं म्हणतात. आपला डोळा गोल असून त्यामध्ये एक द्रव्य असतं. हे द्रव्य डोळ्यांमध्ये तयार होत राहतं आणि डोळ्यांमधून बाहेरही पडतं. डोळ्यांमध्ये हे द्रव्य तयार होणं आणि बाहेर पडणं या प्रक्रियेमध्ये ज्यावेळी अडथळा तयार होतो त्यावेळी डोळ्यांच्या समस्या जाणवू लागतात. डोळ्यांमध्ये काही ऑप्टिक नर्वदेखील असतात. ज्यांच्या मदतीने कोणत्याही वस्तूबाबतचे संकेत मेंदूला मिळण्यास मदत होते. ज्यावेळी डोळ्यांमधील द्रव्य तयार होण्यास अडथळे निर्माण होतात आणि डोळ्यांवर दबाव येतो यामुळे ऑप्टिक नर्व डॅमेज होऊ लागतात. परिणामी डोळ्यांची दृष्टी हळूहळू कमजोर होऊ लागते. जर या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्षं केलं तर कायमचं अंधत्वही येऊ शकतं.
जाणून घ्या लक्षणं :
ओपन अँगल ग्लूकोमाची ठराविक अशी काही लक्षणं नसतात. यामध्ये डोळ्यांना वेदना होत नाहीत आणि दिसण्यासही काही त्रास होत नाही. तरीदेखील काही लक्षणांच्या आधारे या आजाराबाबत अंदाज बांधता येतात.
ग्लूकोमाची ही असू शकतात लक्षणं :
- चश्म्याच्या नंबर सतत बदलणं
- दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी डोळे दुखणं किंवा डोकेदुखीचा त्रास होणं.
- बल्बच्या चारही बाजूंना इंद्रधनुष्याप्रमाणे रंग दिसून येतात.
- अंधाऱ्या खोलीमध्ये वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्रास होणं.
- साइड व्हिजनला नुकसान पोहोचणं.
'ही' असू शकतात कारणं :
मोतीबिंदूचं निदान मॅन्युअल करता येत नाही, तसेच कारणंही समजणं कठिण होतं. प्राथमिक मोतीबिंदूसाठी एकमात्र कारण म्हणजे अनुवंशिकता. मोतीबिंदूच्या दुसऱ्या प्रकारामध्ये काही विशेष कारणं सांगायची झालीच तर, डोळ्याला जखम होणं, स्टेरॉइडचा वापर करणं किंवा एखाद्या सर्जरीचा डोळ्यांवर प्रवाभ होणं.
ग्लूकोमाला डोळ्यांचा अल्जायमर म्हणूनही ओळखलं जातं. कारण हा आजार वाढलेल्या वयामध्ये होतो. परंतु ग्लुकोमामध्येही काही प्रकार आढळून येतात. एंगल क्लोजर ग्लूकोमाचा परिणाम तरूणांनवरही होतो आणि 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी ओपन एंगल मोतीबिंदूची लक्षणं आढळून येतात. त्याचप्रमाणे नवजात ग्लूकोमाही असतो.