वेगवेगळ्या रंगांची का असतात औषधं? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 09:16 AM2023-05-10T09:16:21+5:302023-05-10T09:16:57+5:30

Reason for Medicine Color : जेव्हा मानवी जीवनाचा विकास होत होता तेव्हा त्यांनी अनेक प्रकारच्या जडी-बुटी आणि औषधांचा शोध लावला. त्यावेळी औषधं टॅलबेट किंवा कॅप्सूलच्या रूपात नव्हती तर ती झाडपत्तीच्या रूपात होती.

Reason for medicine color why are medicines colorful | वेगवेगळ्या रंगांची का असतात औषधं? जाणून घ्या यामागचं कारण...

वेगवेगळ्या रंगांची का असतात औषधं? जाणून घ्या यामागचं कारण...

googlenewsNext

Reason for Medicine Color  : जेव्हा तुम्ही किंवा घरात कुणी आजारी पडलं असेल तर तुम्ही बघितलं असेल की, डॉक्टर वेगवेगळ्या रंगाच्या गोळ्या देतात. पण गोळ्यांच्या किंवा औषधांच्या या वेगवेगळ्या रंगाचं काय कारण असतं याचा कधी विचार केला का? या वेगवेगळ्या रंगाचा आणि आजारांचा काही संबंध आहे का? जर तुम्हाला याचं उत्तर माहीत नसेल तर आज जाणून घ्या.

रिपोर्टनुसार जेव्हा मानवी जीवनाचा विकास होत होता तेव्हा त्यांनी अनेक प्रकारच्या जडी-बुटी आणि औषधांचा शोध लावला. त्यावेळी औषधं टॅलबेट किंवा कॅप्सूलच्या रूपात नव्हती तर ती झाडपत्तीच्या रूपात होती. नंतर या जडी-बुटी किंवा झाडांचा रस म्हणजे अर्क काढून ते पावडरमध्ये रूपांतरित करून गोळ्या बनवल्या गेल्या. असं मानलं जातं की, औषधांचा गोळ्यांच्या रूपात वापर सगळ्यात आधी इजिप्तमध्ये झाला. त्यावेळी औषधं एक खास माती किंवा ब्रेडमध्ये मिक्स करून तयार केली जात होती.

कधीपासून तयार झाली रंगीबेरंगी कॅप्सूल

यूरोपमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाल्यानंर 1960 च्या आसपास औषधे पांढऱ्या रंगाच्या गोळ्यांच्या रूपात तयार केली जाऊ लागली. नंतर हाय टेक्नॉलॉजी विकसित झाल्यावर औषधांच्या निर्माणात बदल करण्यात आला. 1975 च्या आसपास रंगीबेरंगी कॅप्सूल तयार केल्या जाऊ लागल्या. लिक्विड औषधांमध्येही रंग टाकले गेले. 

वेगवेगळ्या रंगाची का असतात औषधे

रिपोर्टनुसार, सध्या औषधांच्या कॅप्सूल तयार करण्यासाठी 75 हजारांपेक्षा जास्त कलर कॉम्बिनेशनचा वापर केला जातो. तेच टॅबलेटच्या कोटिंगसाठीही वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो. यामागचं कारण असं सांगितलं जातं की, जी लोकं औषधांची नावं वाचून त्यात फरक करू शकत नाही, ते औषधांचा रंग बघून सहज त्यात फरक करू शकतात. रंगांमुळे त्यांना औषधांमध्ये फरक करणं सोपं जातं.

आजारांसोबत काय असतो रंगांचा संबंध

यूएसमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, औषधांच्या रंगांचा आजारांसोबतही काहीना काही संबंध असतो. ज्या आजारांमध्ये कमी पॉवरची औषधे दिली जातात, त्यांचा रंग हलका असतो. तर लगेच प्रभाव करणाऱ्या औषधांचा रंग गर्द असतो. इतकंच नाही तर गंध आणि टेस्टच्या आधारावरही औषधांचा रंग ठरवला जातो. 

Web Title: Reason for medicine color why are medicines colorful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.