...म्हणून होतात डायबिटिक फूट अल्सर; असा करा बचाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 06:35 PM2019-04-11T18:35:05+5:302019-04-11T18:35:19+5:30

व्हिटॅमिन-डी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत म्हणजे, सुर्याच्या किरणांचा प्रकाश आहे. याव्यतिरिक्त इतर अनेक खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधूनही व्हिटॅमिन-डी शरीराला मिळतं.

This reason to increase risk for diabetic foot ulcer | ...म्हणून होतात डायबिटिक फूट अल्सर; असा करा बचाव 

...म्हणून होतात डायबिटिक फूट अल्सर; असा करा बचाव 

व्हिटॅमिन-डी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत म्हणजे, सुर्याच्या किरणांचा प्रकाश आहे. याव्यतिरिक्त इतर अनेक खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधूनही व्हिटॅमिन-डी शरीराला मिळतं. व्हिटॅमिन-डी विघटनशील फायबर प्रो-हार्मोन्सचा एक समूह असतो. जो शरीराला कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फेट आणि झिंक अब्जॉर्ब करण्यासाठी मदत करतो. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तेच व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे डायबिटीक फुट अल्सरची समस्या होते. यामुळे या समस्येने पीडित असणाऱ्या व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्येमुळे फार त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

डायबिटिक फूट अल्सर 

डायबिटीजच्या रूग्णांना आरोग्याच्या इतरही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातीलच एक म्हणजे, डायबिटिक फूट अल्सर. पायांना अल्सर झाल्यामुळे स्किनचे टिशू तुटतात आणि त्याखालील स्किनची लेयर दिसू लागते. पायांमध्ये अल्सर अंगठा आणि तळव्यावर होतात. पण हे अल्सर पायांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. अल्सर हाडांना प्रभावित करतात. पायांना अल्सर होण्याचा धोका डायबिटीजने ग्रस्त असलेल्या रूग्णांना अधिक असतो. पायांची व्यवस्थित देखभाल केल्याने यापासून सुटका करणं सहज शक्य होतं. जर तुमच्या पायांच्या त्वचेचा रंग बदलत असेल तर डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणं गरजेचं असतं. कधी-कधी असं होतं की, पायांना अल्सर होण्याआधी त्याबाबत काहीच त्रास जाणवत नाही. डायबिटीजचं सर्वात मोठं कारण म्हणजे, व्हिटॅमिन डीची कमतरता होते. असं सांगण्यात येतं की, जर एखाद्या व्यक्तीला एकत्र लठ्ठपणा आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर डायबिटिक फूट अल्सर होण्याचा धोका वाढतो. 

व्हिटॅमिन-डीची कमतरता अशी पूर्ण करा :

1. आहारात फिश म्हणजेच माशांचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

2. धान्य पदार्थांमध्येही व्हिटॅमिन-डी मुबलक प्रमाणात आढळून येतं. 

3. संत्र्याच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन-डी मुबलक प्रमाणात असतं. 

4. व्हिटॅमिन-डीसाठी अंड्यांचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

5. दूध आणि दूधाच्या पदार्थांमधून शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-डी मिळतं. त्यातील 20 टक्के दूधातून मिळतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: This reason to increase risk for diabetic foot ulcer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.