तुमच्याही शरीरात असू शकते ऑक्सिजनची कमतरता; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 07:59 PM2020-09-01T19:59:34+5:302020-09-01T20:13:48+5:30
शरीरात कोणत्या कारणांमुळे ऑक्सिजनची कमतरता आढळते. तसंच लक्षणं काय आहेत याबाबत माहिती देणार आहोत.
शरीरात असलेली ऑक्सिजनची कमतरता वेगवेगळ्या आजारांचे कारण ठरू शकते. शरीरातील ऑक्सिनजनचा स्तर कमी झाल्यानंतर रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. ऑक्सिजनची कमतरता असल्या व्हायरस आणि बॅक्टेरिया शरीरावरांवर आक्रमण करू शकतात. शरीरात कोणत्या कारणांमुळे ऑक्सिजनची कमतरता आढळते. तसंच लक्षणं काय आहेत याबाबत माहिती देणार आहोत.
शरीरात ऑक्सिजनची कमतरता असणं महणजेच शारीरीक क्रियांसाठी आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा न होणं. जेव्हा शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिनजन होत नाही तेव्हा थकवा आल्यासारखं वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो. शरीरातील रक्तप्रवाह संथपणे होतो. त्यामुळे थकवा जास्त येतो.
शरीरात ऑक्सिनजची कमतरता असल्यास ब्रेन डॅमेज किंवा हार्ट अटॅकची स्थिती उद्भवते. डायबिटिस असलेल्या रुग्णांच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्यास साखरेचं प्रमाण अचानक वाढतं. त्यामुळे शारीरिक स्थिती खराब होते. ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यास थायरॉईडची समस्याही उद्भवते. त्यामुळे वजन कमी होतं किंवा जास्त वाढतं. Hypothyroidism किंवा Hyperthyroidism समस्या यामुळे उद्भवते.
शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्याची कारणं
शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्याचे अनेक कारणं असू शकतात. जीवनशैलीशी निगडीत घटकांचा परिणाम शरीरावर होत असतो. जे लोक जास्तीत जास्त वेळ एकाच जागी बसून असतात त्यांना ही समस्या उद्भवू शकते. शारीरिक हालचाली न केल्यासं शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासते.
अनेकजण शारीरिक श्रमाचं काम करतात. त्या तुलनेत आहार व्यवस्थित घेत नाहीत. परिणामी शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासते. शरीरात आयर्नची कमतरता असल्यासही ऑक्सिजन लेव्हल कमी होते. कारण फुफ्फुसांपर्यंत हवा पोहोचवण्यासाठी आयर्नची भूमिका महत्वाची असते.
व्यायाम केल्यानं किंवा योगा केल्यानं शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. हृदय चांगले राहते. यासोबतच चांगला आहार घेतल्यास फुफ्फुस चांगली राहतात. शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून निघते. डाळी, ताज्या भाज्या, अंडी, दूध, पनीर, व्हिटामीन्स युक्त फळं, भाकरी यांचा आहारात समावेश करायला हवा.
ब्रिदिंग या व्यायाम प्रकारात तुम्हाला श्वसन यंत्रणेवर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये रक्त पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल. सगळ्यात आधी ४ सेकंदापर्यंत श्वास रोखून धरा. जेणेकरून फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचेल. मग ४ सेकंदांनी श्वास सोडून द्या. त्यामुळे शरीराला ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो.
रोज ७ ते ८ तास झोपल्यानं निरोगी राहण्यास मदत होते. कारण तुम्ही दिवसभरात वेगवेगळी कामं करत असता. अनेकदा औषधांचे सेवन केलं जातं. अशावेळी पुरेशी झोप झाली नाही तर शारीरिक स्थिती खराब होण्याची शक्यता असते. जर पूर्ण झोप झाली तर उत्साह वाढण्यास मदत होईल.
हे पण वाचा-
नाष्त्याला पोहे खाण्याचे 'हे' ५ आरोग्यदायी फायदे वाचाल; तर रोज आवडीनं खाल
खुशखबर! इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही उपचारांशिवाय मानवी शरीरानं केली HIV वर मात
कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांसह 'या' अवयवांवर होत आहे गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा दावा