पायांमध्ये झिणझिण्या येण्याची 5 गंभीर कारणं, लक्षणं दिसताच डॉक्टरांचा घ्या सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 10:44 AM2024-03-20T10:44:52+5:302024-03-20T10:45:36+5:30
Tingling feet :पायांमध्ये झिणझिण्या येणं ही एक गंभीर समस्या आहे. असं होणं 5 गंभीर आजारांचा संकेत असू शकतो. चला जाणून घेऊ यामागचं कारण...
Tingling feet : अलिकडे लोकांना चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. यातील काही आजारांचे संकेत शरीर देतं तर काही आजारांचे संकेत फार उशीरा दिसतात. अशात समस्या वाढलेली असते. जर या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर गंभीर स्थितीचा सामना करावा लागू शकतो किंवा जीवही जाऊ शकतो. पायांमध्ये झिणझिण्या येणं ही एक गंभीर समस्या आहे. असं होणं 5 गंभीर आजारांचा संकेत असू शकतो. चला जाणून घेऊ यामागचं कारण...
1) पायांमध्ये झिणझिण्या येणं किंवा टोचल्यासारखं वाटत असेल तर हा किडनी खराब होत असल्याचं संकेत असू शकतो. किडनीमध्ये काही समस्या झाली तर बॉडी डिटॉक्स योग्यपणे होत नाही. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाही. त्याच्या लक्षणांपैकी एक म्हणजे पायांमध्ये झिणझिण्या येणं.
2) डायबिटीसच्या रूग्णांनाही पायांमध्ये झिणझिण्या येण्याची समस्या होते. ब्लड शुगर तंत्रिकेला नुकसान पोहोचल्याने पायांमध्ये झिणझिण्या येतात.
3) ऑटो इम्यूनचाही धोका असल्यावर पायांमध्ये झिणझिण्या जाणवतात. यात रुमेटीइड अर्थरायटिस, कमजोर इम्यूनिटी, ल्यूपस असू शकतो.
4) कशाचं इन्फेक्शन झाल्यावरही तुम्हाला पायांमध्ये झिणझिण्या जाणवू शकतात. यात हात आणि पायांमध्ये टोचल्यासारखं वाटतं. यात नसांचं नुकसान होतं. ज्यामुळे पाय आणि हातांवर टोचल्यासारखं वाटतं आणि वेदनाही होतात.
5) पायांमध्ये झिणझिण्या येण्याचं आणखी एक कारण म्हणजे व्हिटॅमिन बी ची कमतरता असू शकतं. व्हिटॅमिन बी तुम्ही कडधान्य, बीन्स, डाळी, ड्राय फ्रूट्सच्या माध्यमातून मिळवू शकता.
सोबत तुम्ही डेअरी प्रोडक्टस जसे की, पनीर, दूध, छास, इत्याची सेवन करा. तसेच हिरव्या पालेभाज्यांमध्येही व्हिटॅमिन बी भरपूर असतं.