'या' कारणाने जंक फूड खाण्याची सवय सोडणं कठीण होऊन बसतं, रिसर्चमधून खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 04:38 PM2023-02-15T16:38:53+5:302023-02-15T16:39:30+5:30

Junk Food : जंक फूड किंवा फास्टूफूड खाऊन आरोग्य धोक्यात येऊ शकतं हे माहीत असूनही अनेकजण हे पदार्थ खातात, पण त्यांना हे पदार्थ खाण्याची लालसा सोडता येत नाही.

Reason why difficult to quit junk food according study | 'या' कारणाने जंक फूड खाण्याची सवय सोडणं कठीण होऊन बसतं, रिसर्चमधून खुलासा...

'या' कारणाने जंक फूड खाण्याची सवय सोडणं कठीण होऊन बसतं, रिसर्चमधून खुलासा...

googlenewsNext

Junk Food : जंक फूड खाणे ही आता सामान्य बाब झाली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जंक फूड आवडतात. इतकेच नाही तर अनेकांना याचे दुष्परिणाम माहीत असूनही ते हे पदार्थ नेहमी खातात. अनेकांना एकप्रकारे या पदार्थांची सवयची लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जंक फूड किंवा फास्टूफूड खाऊन आरोग्य धोक्यात येऊ शकतं हे माहीत असूनही अनेकजण हे पदार्थ खातात, पण त्यांना हे पदार्थ खाण्याची लालसा सोडता येत नाही. हे पदार्थं खाण्यापासून अनेकांना स्वत:ला रोखताही येत नाही. पण हे पदार्थ खाण्याची सवय का सोडता येत नाही, याचा खुलासा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.  

सामान्य नाहीये ही सवय

एका शोधानुसार, जंक फूड खाण्याची सवय ही तंबाखू किंवा नशा या सवयींसारखी असते. ही सवय केवळ तरुणाईमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही बघायला मिळते. इतकंच काय तर जंक फूड अनेकांच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे. सामान्यत: जंक फूड खाण्याचे दुष्परिणाम माहीत असूनही अनेकजण हे पदार्थ खाण्याची सवय सोडू शकत नाहीत. 

का लागते ही सवय?

जंक फूडमध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट, फॅट आणि शुगर असते. यातील जास्तीत जास्त तळून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये पिझ्झा, बर्गर, फ्रॅंकी, चॉकलेट, पेटीज इत्यादींचा समावेश होतो. पण याच पदार्थामुळे आरोग्याला वेगवेगळ्या समस्या होतात. सामान्यपणे जंक फूडमध्ये आढळणारी शुगर, फॅट आणि इतर गोष्टींमुळे आपल्याला या पदार्थांची सवय लागते. शुगर आणि फॅटचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीरात डोपामाइन नावाचं रसायन रिलीज होतं. या रसायनामुळे व्यक्तीला फार चांगलं जाणवतं. त्यामुळे अनेकदा चांगलं वाटावं असं आपल्याला वाटतं आणि असं करत करता या पदार्थांची आपल्याला सवय लागते. 

का या पदार्थांची सवय सुटत नाही?

यूनिव्हर्सिटी ऑफ तस्मानियाने प्रकाशित केलेल्या अॅपेटिट मॅगझिनमध्ये याचं कारण सांगण्यात आलं आहे. जंक फूडची सवय का सोडवली जात नाही हे जाणून घेण्यासाठी ५० व्यक्तींच्या दैंनदिन जीवनावर १० दिवस निरीक्षण करण्यात आलं. यात त्यांचा मूड, खाण्याच्या सवयी, सोशल इंटरॅक्शन आणि त्यांची वागणूक यावर लक्ष ठेवण्यात आलं होतं.  

त्यानंतर या अभ्यासातून हे स्पष्ट झालं की, जंक फूडची सवय का सोडवली जात नाही. या अभ्यासात म्हटले आहे की, घरचं जेवण ही सर्वांची कमजोरी आहे. सर्वांनाच घरचं जेवण आवडतं. मात्र सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे घरी जेवण तयार करण्यासाठी अनेकांकडे वेळच नाहीये. इथेच जंक फूड आपलं काम करुन जातं. मेट्रो स्टेशनपासून ते ऑफिस, एअरपोर्ट, मॉल्स, रस्त्यांवर सगळीकडेच जंक फूड सहज उपलब्ध होतात. त्यामुळे अनेकजण हे पदार्थ खाण्याची सवय सोडू शकत नाही. अशात या पदार्थांपासून सुटका मिळवण्यासाठी हे पदार्थ तुम्ही जिथे जास्त वेळ घालवता त्या ठिकाणापासून दूर ठेवा. उदाहरणार्थ तुमचं ऑफिस. 

काय करु शकता? 

हे पदार्थ खाण्याची सवय लागण्याचं आणखी एक कारण म्हणजे आपलं मूड. तुम्ही नाराज, निराश, दु:खी असाल तर जास्त जंक फूड खाता. त्यामुळे तुमच्या भावनांवर कंट्रोल मिळवला तर या पदार्थांच्या सेवनावरही कंट्रोल मिळवता येऊ शकतो. या पदार्थांची सवय सोडवण्यासाठी हे जाणून घेणे गरजेचे आहे की, तुम्ही जंक फूड का आणि कधी खाता? तसेच या पदार्थांकडे तुम्ही कधी आकर्षित होता हेही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर आणि मनावर नियंत्रण ठेवल्यावरच तुम्ही जंक फूडच्या सवयीपासून सुटका मिळवू शकता. 

Web Title: Reason why difficult to quit junk food according study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.