दुपारच्या जेवणानंतर का येते झोप? आळस नव्हे खरं कारण वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 06:02 PM2022-09-04T18:02:02+5:302022-09-04T18:05:01+5:30

एका संशोधनातून ही कारणं स्पष्ट झाली आहेत. जेवल्यानंतर आळस, सुस्ती किंवा झोप या गोष्टी टाळायच्या असतील तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

reasons behind laziness after lunch or feeling sleepy after lunch | दुपारच्या जेवणानंतर का येते झोप? आळस नव्हे खरं कारण वाचून व्हाल थक्क

दुपारच्या जेवणानंतर का येते झोप? आळस नव्हे खरं कारण वाचून व्हाल थक्क

googlenewsNext

नाश्ता भरपेट झाला किंवा दुपारी अथवा रात्री स्वादिष्ट जेवण जेवल्यानंतर अनेकदा आपल्याला आरामदायी बेडचा विचार मनात येऊ लागतो. विशेषतः दुपारी जेवण (Lunch) झाल्यावर आपल्याला आराम (Rest) जास्त हवाहवासा वाटतो. काही जण ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर जांभया देताना किंवा डुलकी घेताना दिसतात. हा केवळ आळस (Laziness) आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे, असा विचार तुमच्या मनात कधी आला आहे का? जेवल्यानंतर आळस येणं किंवा झोप घ्यावीशी वाटणं यामागे काही कारणं आहेत. एका संशोधनातून ही कारणं स्पष्ट झाली आहेत. जेवल्यानंतर आळस, सुस्ती किंवा झोप या गोष्टी टाळायच्या असतील तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

ऊर्जा मिळावी यासाठी अन्न सेवन केलं जातं; पण जेवल्यानंतर झोप का येते या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी फूड मार्बल (Food Marble) नावाच्या कंपनीनं संशोधन केलं. या संशोधनात त्यांनी खाल्ल्यानंतर सुस्ती आणि झोपेसाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी शोधून काढल्या. आपण जे अन्न खातो ते झोपेसाठी एक महत्त्वाची भूमिका बजावतं.

हॉर्मोन्स बजावतात महत्त्वाची भूमिका
न्यूट्रिशन एक्सपर्ट आणि शास्त्रज्ञ डॉ. क्लेअर शॉर्ट यांच्या मते, अन्न खाल्ल्यानंतर आपली आतडी, तसंच संपूर्ण शरीर काम करू लागतं. ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) कमी होणं, हे यामागचं कारण असू शकतं. कारण गोड पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरातली ब्लड शुगर लेव्हल वाढते आणि नंतर वेगानं कमी होऊ लागते. या क्रियेमुळे थकवा (Fatigue) जाणवतो. यात हॉर्मोन्सदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. जेवल्यानंतर शरीरातलं सेरोटोनिन म्हणजेच फील गुड हॉर्मोन (Feel Good Hormone) झपाट्यानं वाढतं. यामुळे झोप येते. स्पोर्ट्स मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, जेवणानंतरची सुस्ती किंवा आळस हा सेरोटोनिन हॉर्मोनशी संबंधित असतो.

'या' गोष्टींमुळे येते झोप
डॉ. शॉर्ट यांच्या मते, 'ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अ‍ॅसिड (Amino acid) असलेले पदार्थ सेवन केल्याने जास्त झोप येऊ शकते. हे अमिनो अ‍ॅसिड पनीर, अंडी, टोफू यांसारख्या उच्च प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये आढळते. याशिवाय ज्या पदार्थांमध्ये मेलाटोनिनचे प्रमाण जास्त असतं, तेदेखील झोपेसाठी कारणीभूत ठरू शकतात. उच्च फायबरयुक्त (High Fiber) पदार्थांचा आहारात समावेश केल्यास झोप, सुस्ती किंवा आळस येण्याची शक्यता कमी होते. याशिवाय प्रमाणात जेवल्यास सुस्ती आणि आळस कमी येतो,' असं डॉ. शॉर्ट यांनी स्पष्ट केलं.

Web Title: reasons behind laziness after lunch or feeling sleepy after lunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.