'या' ४ कारणांमुळे सतत लघवी येऊन अर्ध्या रात्री होतं झोपेचं खोबरं!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 02:52 PM2020-01-31T14:52:58+5:302020-01-31T14:53:02+5:30

आपण दिवसभर आपली दिनचर्या संपवून रात्री झोपायला जात असतो.  

Reasons of constant urination at mid night | 'या' ४ कारणांमुळे सतत लघवी येऊन अर्ध्या रात्री होतं झोपेचं खोबरं!

'या' ४ कारणांमुळे सतत लघवी येऊन अर्ध्या रात्री होतं झोपेचं खोबरं!

googlenewsNext

आपण दिवसभर आपली दिनचर्या संपवून रात्री झोपायला जात असतो. अनेक लोकांना रात्री झोपल्यानंतर सकाळी उठेपर्यंत सतत लघवीला जाण्याची सवय असते. सध्या हिवाळा असल्यामुळे थंडी शरीर थंड पडण्याचा त्रास होतो. अशा वातावरणात लघवी लागण्याची समस्या अधिकच तीव्र होत जाते. खासकरून महिलांना हा त्रास जास्त जाणवतो. अनेकदा या कारणामुळे झोप मोड सुद्धा  होत असते. आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी सतत लघवी लागण्याची कारणं सांगणार आहोत.

डायबिटीस

जर तुम्हाला डाटबिटीस असेल तर सतत लघवी लागण्याचा त्रास होत असतो. रक्तातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी शरीरात मूत्र तयार होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे जास्त प्रमाणात लघवी होऊ शकते. जर तुम्हाला  सतत लघवी  लागण्याचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टारांशी संपर्क साधून योग्य ते उपचार घ्या. ( हे पण वाचा-अंगदुखीचं कारण ठरू शकतो हाडांचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)

रात्रीच्यावेळी मद्याचे सेवन करणे

आपण सहसा बघतो की लोक दारू पिऊन रात्री झोपतात. पण रात्री झोपण्याच्या आधी जर तुम्ही मद्याचे सेवन करत असाल तर तुम्हाला हा त्रास होण्याची जास्त होण्याची शक्यता असते. जर  तुम्हाला रात्रीची शांत झोप हवी असेल तर मादक पदार्थांचे सेवन करणं टाळा. साधारणपणे झोपण्यापूर्वी ३ तास आधी मद्याचे सेवन करू नका.  ( हे पण वाचा-वजन कमी करण्यासह दातांच्या समस्येवर फायदेशीर तुळशीचं पाणी, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्)

हार्मोन्सचा अभाव

जर तुमच्या शरीरात  अँटिडायुरेटीक हार्मोनची कमी असेल तर तुम्हाला ही समस्या सतावू शकते. या हार्मोनमुळे किडनीला द्रव पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे या हार्मोनची कमतरता निर्माण झाल्यास जास्त वेळा लघवीची समस्या निर्माण होते. त्यासाठी या समस्येकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन  त्वरीत उपचार करा. अन्यथा मोठा आजार होण्याची समस्या असते. 

पाण्याचे अतिसेवन

झोपण्याच्या आधी जर तुम्ही जास्त पाणी प्याल तर तुम्हाला मध्यरात्री ही समस्या जाणवू शकते. लोकांना झोपण्याअगोदर किती पाणी प्यावं याची कल्पना नसते. त्यामुळे काहीवेळा जास्त पाणी प्यायल्याने लोक मध्यरात्री लघवीसाठी उठतात. शक्यतो झोपण्यापूर्वी एक तास आधी पाणी पिऊ नये.

Web Title: Reasons of constant urination at mid night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.