केवळ हा हार्ट अटॅक नाही तर या कारणानेही छातीत होते वेदना, जाणून कारणे...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 09:27 AM2022-10-10T09:27:00+5:302022-10-10T09:29:29+5:30
Reasons For Chest Pain: कधी कधी छातीत वेदना होण्याची वेगळीही कारणे असतात. कोरोना व्हायरस महामारीनंतर लोकांच्या शरीरात वेगवेगळी लक्षण दिसत आहेत. चला जाणून घेऊ छातीत वेदना होण्याची इतर कारणे...
Reasons For Chest Pain: जेव्हा छातीत वेदना सुरू होतात तेव्हा व्यक्ती घाबरतात. कारण तेच हार्ट अटॅकचं मुख्य लक्षण आहे. पण कधी कधी छातीत वेदना होण्याची वेगळीही कारणे असतात. कोरोना व्हायरस महामारीनंतर लोकांच्या शरीरात वेगवेगळी लक्षण दिसत आहेत. चला जाणून घेऊ छातीत वेदना होण्याची इतर कारणे...
कोरडा खोकला
कोरड्या खोकल्यामुळे छातीच्या मसल्सवर फार जोर पडतो. ज्यामुळे या मांसपेशी कमजोर होतात आणि यामुळेच छातीत वेदना सुरू होतात. जर खोकला लवकर बरा झाला नाही तर ही समस्या वाढू शकते.
पल्मोनरी एम्बोलिज्म
पल्मोनरी एम्बोलिज्म एक अशी मेडिकल कंडिशन आहे ज्यामुळे छातीत वेदना होऊ शकतात. ही हृदयासंबंधी समस्या आहे ज्यात लंग्सपर्यंत ब्लड सप्लाय करणाऱ्या धमण्यांमध्ये क्लॉटिंग होते. अशा लंग्सपर्यंत पुरेसं रक्त पाठवलं जात नाही. त्यामुळे छातीत वेदना सुरू होते.
फुप्फुसात इन्फेक्शन
कोरोना व्हायरस दरम्यान लोकांच्या फुप्फुसात जास्त इन्फेक्शन बघायला मिळालं. यामुळे छातीत वेदना होण्याची समस्या झाली. जर फुप्फुसात एखाद्या दुसऱ्या व्हायरसने अटॅक केला तर छातीत वेदना होण्याची समस्या होऊ शकते.
कोविड निमोनिया
कोरोना व्हायरसच्या रूग्णांना छातीत वेदनेमुळे अनेक लोकांना कोविड निमोनियाची समस्या झाली. म्हणजे जर फुप्फुसात इन्फेक्शन झालं तर तुमच्या अशा निमोनियाचा धोका तयार होऊ शकतो. ज्यात लंग्सच्या एअर बॅगवर सूज येते यामुळे छातीत वेदना होते.