रात्री झोपेत घाम येणं या गंभीर समस्यांचं आहे लक्षण, वेळीच सावध झालेलं बरं...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:33 PM2022-12-31T12:33:17+5:302022-12-31T12:35:17+5:30
Reasons For Sweating At Night: काही लोकांना रात्रीच्या वेळीही घाम येतो ज्यामुळे झोपेचीही समस्या होते. या समस्येकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ ही स्थिती कोणत्या गोष्टींकडे इशारा करते.
Reasons For Sweating At Night: घाम येणं ही सामान्य प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही वर्कआउट किंवा हेवी एक्सरसाइज करता किंवा उन्हाळा असेल तर घाम येतोच. पण जर तुम्हाला हिवाळ्यातही घाम येत असेल किंवा एसीमध्येही घाम येत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. काही लोकांना रात्रीच्या वेळीही घाम येतो ज्यामुळे झोपेचीही समस्या होते. या समस्येकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ ही स्थिती कोणत्या गोष्टींकडे इशारा करते.
रात्री का येतो घाम?
1) टेंशन वाढणं
टेंशन वेगवेगळ्या कारणांनी येतं, जसे की, नोकरीमध्ये समस्या, प्रेम किंवा मैत्रीत दगा, पैशांची अडचण, परीक्षेत नापास होणे किंवा एखादा गंभीर आजार. जेव्हा तुम्ही रात्री झोपताना आयुष्यातील या समस्यांचा विचार करता तेव्हा घाम येऊ लागतो. सगळ्यात गरजेचं हे आहे की, तुमची चिंता दूर करण्याचा उपाय करा. या समस्या दूर झाल्या तर चिंताही राहणार नाही.
2) दारूचं व्यसन
जे लोक खूप जास्त दारूचं सेवन करतात त्यांचं शरीर वेगळ्या प्रकारे रिस्पॉन्ड करू लागतं. काही लोकांना लेट नाईट पार्टीजमध्ये अल्कोहोल सेवन करण्याची सवय असते, ज्यामुळे त्यांना झोपताना खूप घाम येतो. मुळात या चुकीच्या सवयीमुळे व्यक्तीचा हार्ट रेट वाढू लागतो. ज्यामुळे त्यांना अस्वस्थता जाणवते आणि मग घाम येऊ लागतो.
3) लो ब्लड शुगर लेव्हल
जर तुमच्या रक्तात शुगरचं प्रमाण कमी झालं तर कोणत्याही वेळी घाम येऊ शकतो. या मेडिकल कंडिशनला हाइपोग्लाइसीमिया (Hypoglycaemia) म्हणतात. जेव्हा रात्रीच्या वेळी ग्लूकोज लेव्हल कमी झाल्यावर एड्रेनालाइन हार्मोन रिलीज होतात. तेव्हा घामाचे ग्लॅंड सक्रिय होतात.
4) औषधाचं सेवन
काही खास औषधांचं सेवन केल्यानेही रात्री घाम येण्याची समस्या होऊ शकते. खासकरून रेग्युलर पेन किलर खाल्ल्याने अशी समस्या तयार होते. यासाठी तुम्ही एखाद्या स्पेशालिस्ट डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.