पोटावरील चरबी वाढण्याची कारणे आणि कमी करण्याचे सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 10:20 AM2019-09-24T10:20:26+5:302019-09-24T10:24:19+5:30
यात जराही शंका नाही की, लठ्ठपणामुळे आपलं शरीर वेगवेगळ्या आजारांचं घर बनतं. डायबिटीस, हृदयरोग आणि हाडांशी संबंधित वेगवेगळ्या समस्या वेगाने वाढू लागतात.
(Image Credit : thefast800.com)
यात जराही शंका नाही की, लठ्ठपणामुळे आपलं शरीर वेगवेगळ्या आजारांचं घर बनतं. डायबिटीस, हृदयरोग आणि हाडांशी संबंधित वेगवेगळ्या समस्या वेगाने वाढू लागतात. खासकरून पोटावर आलेल्या चरबीमुळे आजार तर होतातच सोबतच तुमचा लूक आणि पर्सनॅलिटीदेखील खराब होते. अशात वाढतं पोट कमी करण्यासाठी पोट वाढण्याचं कारण तुम्हाला माहीत असायला हवं आणि त्यानंतर तुम्ही पोट कमी करण्याचं प्लॅनिंग करू शकता.
झोप पूर्ण न होणे आणि मद्यसेवन
झोप पूर्ण न होणे हे लठ्ठपणाचं मुख्य कारण आहे. बिझी शेड्यूलमुळे अनेकांना पुरेशी झोप घ्यायला मिळत नाही. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्ही खाताही जास्त. अशात लठ्ठपणा वाढण्याची शक्यता दुप्पट असते. तसेच अनेकजण दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्री मद्यसेवन करतात. याने थोडा तणाव दूर नक्कीच होतो, पण पोट वाढू लागतं. तसेच इतर समस्याही होतातच.
तेल, मैदा, साखर इत्यादींचं अधिक सेवन
आपला रोजचा आहार देखील आपलं पोट वाढवण्याचं काम करतं. तुम्ही ज्या तेलात पदार्थ तयार करता त्यात ओमेगा-६ फॅट अॅसिड जास्त असेल आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड फार कमी असेल तर याने सुद्धा तुमचा लठ्ठपणा वाढू लागतो. त्यासोबतच मैद्यापासून तयार पदार्थ खाल्ल्यानेही लठ्ठपणासोबतच डायबिटीस आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका असतो. सोबतच जर तुम्हाला गोड पदार्थ पसंत असतील तर यानेही तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. आहारात सारखेचा वापर असलेले पदार्थ जसे की, फ्रूट ज्यूस, पेस्ट्री, केक, कॅंडीज, चॉकलेट इत्यादी पदार्थांमुळेही पोटावरील चरबी वाढते.
थोडं-थोडं खावं आणि पाणी पित रहावं
(Image Credit : allure.com)
आता तुम्हाला पोटावरील चरबी वाढण्याचं कारण माहीत झालं आहेच, तर ती कमी करण्याचे काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कधीही एकाचवेळी भरपूर खाऊ नका. थोडं-थोडं खावं. याने शरीराचं मेटाबॉलिज्म योग्य राहील आणि पोटावरील चरबी कमी करण्यासही मदत मिळते. तसेच जेव्हाही तुम्ही काही खाल तेव्हा मधे मधे एक एक घोट पाणी पित रहावे. असं केल्यास तुम्ही जास्त खाणार नाहीत. किंवा जेवणाआधी पाणी प्यावे म्हणजे पोट भरलं राहिल्याने जास्त खाणार नहीत. जर पाणी कोमट असेल तर उत्तम.
लिंबू आणि ओव्याचा चहा
लिंबाचं कोणत्याही प्रकारचं सेवन केल्यास लठ्ठपणा आणि एस्क्ट्रा चरबी दूर केली जाते. लेमन टी लोकांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. वजन कमी करण्यासाठी लेमन टी फारच फायदेशीर मानला जाते. लेमन टीममध्ये साखरेऐवीज मधाचा वापर करावा. त्यासोबतच ओव्याने सुद्धा वजन कमी करण्यास मदत मिळते. गरम पाण्यात ओवा, बडीशेप, वेलची आणि आलं टाकून ५ मिनिटे उकडू द्या आणि नंतर गाळून सेवन करा.
क्रंच एक्सरसाइज
(Image Credit : gethealthyu.com)
असं मानलं जातं की, क्रंच एक्सरसाइजने सर्वाच वेगाने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. ही एक्सरसाइज तुम्ही जेवढ्या जास्त वेळ कराल तेवढ्या लवकर तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकाल.