पायांचं दुखणं 'या' गोष्टीमुळे अधिक वाढतं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 02:56 PM2020-01-03T14:56:53+5:302020-01-03T15:02:36+5:30
सध्याच्या काळाच बदलत्या वातावरणात सगळ्याच वयोगटातील लोकांना हातांचं किंवा पायांच्या दुखण्याची समस्या उद्भवत असते.
सध्याच्या काळाच बदलत्या वातावरणात सगळ्याच वयोगटातील लोकांना हातांचं किंवा पायांच्या दुखण्याची समस्या उद्भवत असते. पण प्रत्येक व्यक्तीच्या दुखण्यामागे कारण वेगवेगळे असते. त्याची तीव्रता सुद्धा वेगवेगळी असते. तसंच सध्याच्या काळात बसून काम करणारा व्यक्ती असो किंवा अधिक श्रमाचे काम करणारा व्यक्ती तसंच शाळा, कॉलेजमधल्या मुलांना सुध्दा पायाचं दुखणं सतावत असतं.
पायांच्या दुखण्याबाबत सध्याच्या काळात एक धक्कादायक रिसर्च समोर आला आहे. या रिसर्चनुसार आपण घालत असलेल्या बुटांमुळे पाय दुखण्याची समस्या जाणवते. चला तर मग जाणून घेऊया पायांच्या दुखण्यासंबंधी हा रिसर्च काय सांगतो.
तुमचे शूज तुमच्या पायांचा आकार बिघडवत आहेत. तुम्हाला हे ऐकून जरी आश्चर्य वाटलं असेल तरी हे खरं आहे. ज्या लोकांना शूज घालायला आवडतात. अश्या लोकांच्या पायाच्या टाचा , ज्या लोकांना शूज घालायला आवडत नाहीत अशा लोकांच्या तुलनेत वेगळ्या आहेत. अनेक मोठमोठ्या औद्योगीक ठिकाणी लोक हे शूजचा वापर टाळून पायासाठी आरामदायक चप्पल घालतात.
इटलीच्या यूनिवर्सिटी ऑफ बोलोग्नामधिल संधोधकांनी केलेल्या शोधनूसार नॉर्थ अमेरिका, अफ्रीका आणि यूरोप चे असे मिळून १४२ माणसांच्या टाचांवर परीक्षण करण्यात आले होते. त्यात असं आढळून आलं की आफ्रिकेतील शेतकरी सॅण्डल घालतात. न्यूयॉर्कच्या लोकांच्या टाचा अश्मयुगातील शिकार करत असलेल्या माणसांप्रमाणे होत्या.
अश्मयुगातले शिकारी शूजचा वापर करत नव्हते. त्यांचा टाचा सध्याच्या माणसांच्या टाचांच्या तुलनेने लहान होत्या. त्याकाळाले लोकं अनवाणी पायांनी लांबलांब चालत जायचे. त्याच्या टाचा या खूप लवचीक होत्या. सध्याच्या परिस्थीतीतील लोकांचा विचार केला तर ऑफिसला जात असलेल्या लोकांना सतत शूज घालावे लागतात. त्यामुळे त्यांच्या पायावर परिणाम होऊन आकार बदलत असतो. त्यामुळे टाचा दुखतात आणि वेगवेगळ्या समस्या उद्भवतात.