दिवसापेक्षा रात्री आंघोळ करणे अधिक फायद्याचे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 04:36 PM2018-04-06T16:36:35+5:302018-04-06T16:36:35+5:30
आंघोळ करायची की नाही आणि करायची तर कधी करायची? हा प्रत्येकाचाच खाजगी विषय असू शकतो. अनेकजण दिवसा आंघोळ करण्याला प्राधान्य देतात.
आंघोळ करायची की नाही आणि करायची तर कधी करायची? हा प्रत्येकाचाच खाजगी विषय असू शकतो. अनेकजण दिवसा आंघोळ करण्याला प्राधान्य देतात. पण दिवसा आंघोळ करण्यापेक्षा रात्री आंघोळ करणे अधिक चांगलं असतं. चला जाणून घेऊया असे का?
रात्री का आंघोळ करावी?
जर तुम्ही रात्री आंघोळ करत असाल तर तुम्ही योग्य करताय. एक्सपर्टनुसार, झोपण्याआधी आंघोळ करणे तुमच्या स्कीनसाठी खूप चांगलं असतं. खासकरुन गरमीच्या दिवसात हे करणे अधिक योग्य ठरतं. याचं कारण म्हणजे दिवसभर तुमच्या स्कीनवर धूळ, माती, घाम आणि अॅलर्जी पसरवणारे जर्म्स बसतात. त्यामुळे झोपण्याआधी आंघोळ केल्यास तुमचं शरीर स्वच्छ होईल आणि तुम्हाला झोपही चांगली येईल.
सकाळी आंघोळ करण्याचे फायदे
सकाळी उठून आंघोळ करणे एका चांगल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी चांगली बाब आहे. सकाळी आंघोळ केल्याने तुमच्यातील आळस निघून जातो. सोबतच सकाळी आंघोळ करणे म्हणजे फ्रेश होणे आहे. त्यामुळे रात्री आंघोळ करण्यासोबतच शक्य झाल्यास सकाळीही आंघोळ करा.
काय आहे जास्त फायद्याचे?
रात्रीच्या वेळी आंघोळ करणे जास्त फायद्याचे आहे कारण स्वच्छ होऊन झोपणे गरजेचे आहे. रात्री आंघोळ केल्याने तुम्हाला स्कीनच्या वेगवेगळ्या समस्यांपासून सुटका मिळते. चांगली झोप येते.
रात्रीच्या आंघोळीने झोप खराब होते?
दिवस संपत आला की, तुमच्या शरीराचं तापमान खाली येत रहातं आणि ज्यावेळी तुम्ही झोपता त्यावेळी तुमच्या शरीराचं तापमान सर्वात कमी होतं. रात्री आंघोळ केल्यास तुमच्या शरीरातील तापमान वाढतं. जेव्हा तुम्ही शरीर कापडाने पुसता तेव्हा तुम्हाला थंडी वाजायला लागते. जेव्हा तुमचं शरीर थंड आणि रिलॅंक्स असतं तेव्हा चांगली झोप येते.