लोखंडी कढईत जेवण न करण्याचा का दिला जातो सल्ला? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 01:42 PM2022-08-29T13:42:58+5:302022-08-29T13:46:08+5:30

Health Tips : अनेकांना हे माहीत नाही की, कढईत जेवण न करणं यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. हे कारण आपल्या आरोग्याशी संबंधित आहे.

Reasons why we should avoid to eat food in an iron kadai or pan | लोखंडी कढईत जेवण न करण्याचा का दिला जातो सल्ला? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

लोखंडी कढईत जेवण न करण्याचा का दिला जातो सल्ला? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

Next

Health Tips : अनेकदा तुम्ही घरातील वयोवृद्ध लोकांना नेहमीच हे सांगताना ऐकलं असेल की, कढईत कधीच जेवण करू नये. असं मानलं जातं की, अविवाहित लोक जर कढईत जेवत असतील तर, त्यांच्या लग्नावेळी पाऊस येतो, तेच विवाहित लोकांनी आयुष्यभर आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. याच भितीने आजही लोक कढईत जेवण करणं टाळतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, कढईत जेवण न करणं यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. हे कारण आपल्या आरोग्याशी संबंधित आहे.

राखेने धुवत होते भांडी 

काही वर्षांआधीपर्यंत स्टीलची भांडी नव्हती, ना ते धुण्यासाठी डिटर्जेंट किंवा लिक्विडचा वापर केला जात होता. त्यावेळी जास्तीत जास्त लोक लोखंडाच्या कढईचा वापर करत होते. भात किंवा इतर पदार्थ बनवल्यानंतर त्यावर जळाल्याचे किंवा चिकट डाग राहत होते. ते दूर होण्यासाठी कढई लगेच पाण्यात टाकली जात होती. जेणेकरून कढईला गंज लागू नये किंवा ग्रीस त्यावर राहू नये. त्यानंतर कढई राख किंवा मातीने घासली होत होती. पण आज राखेचा वापर होत नाही. अशात लोखंडाच्या कढईला लागलेला चिकटपणा तसाच राहतो आणि तो नंतर आपल्या पोटात जातो. ज्यामुळे आपण आजारी पडतो.

चिकटपणा वाढण्याची भिती

जर पदार्थ तयार केल्यानंतर लगेच कढईतील पदार्थ काढले नाहीत किंवा ती स्वच्छ केली नाही तर भांड चिकट होऊ शकतं. अशात राख किंवा मातीनेही चिकटपणा दूर होत नाही. जे आरोग्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकतं.

पोट बिघडतं

चिकटपणा असलेल्या कढईत जेवण केल्याने किंवा त्यात पुन्हा पदार्थ बनवल्याने पोट खराब होण्याची शक्यता जास्त असते. बरीच स्वच्छ करूनही काही दिवसांपूर्वीचा चिकटपणा कढईला चिकटून असतो. अशात तुम्ही या कढईत जेवण केलं तर हे कण आपल्या पोटात जातात आणि त्यामुळे पोट खराब होतं.

वैज्ञानिक तथ्य

पूर्वी ही बाब प्रचलित झाली की, जे लोक अविवाहित असतात ते जर कढईत जेवले तर त्यांच्या लग्नावेळी पाऊस येईल आणि विवाहित लोकांनी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. वैज्ञानिक तथ्याला मान्यतेचं रूप देण्यात आलं. जेणेकरून लोकांनी कढईत जेवण करू नये. ही मान्यता आजही लोक मानतात आणि कढईत जेवण करणं टाळतात.

Web Title: Reasons why we should avoid to eat food in an iron kadai or pan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.